म्हेळूस्के l Mheluske (वार्ताहर) :

येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलने सहा जागांवर विजय मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.

तर परिवर्तन पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व योगेश बर्डे हे करत होते तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व बाजीराव बर्डे हे करत होते.

तीन प्रभागांमध्ये एकूण नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एक उमेदवार बिनविरोध झाल्याने आठ जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात होते.

सहा जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला असून तीन जागांवर परिवर्तन पॅनलला समाधान मानावे लागले. ग्रामविकास पॅनलच्या सहा जागा निवडून आल्याने सत्तेची सूत्रे ग्रामविकास पॅनलचे योगेश बर्डे यांच्याकडे आली आहे.