सप्तशृंगी गडावर ग्रामसभा; घेतला 'हा' मोठा निर्णय

सप्तशृंगी गड
सप्तशृंगी गड

सप्तशृंगी गड | प्रतिनिधी | Saptashringi Gadh

येथे आज विशेष ग्रामसभा (Gram Sabha) घेण्यात आली. या ग्रामसभेत सरपंच रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) बसस्थानकासाठी जागा मंजूर करत जागेच्या नेमणुकी संदर्भात ग्रामसभेत महिला व नागरिकांनी आपली मते मांडून जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे माजी परिवहन मंत्री (Former Transport Minister) अनिल परब (Anil Parab) यांनी अर्धेशक्तीपीठ सप्तशृंगी गडावर ३ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीला सरकारकडून शासकीय परिपत्रक जारी करत जागा सुचवण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आला होता.

यासाठी आज सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन शिवालय तलाव (Shivalay Lake) नजीक असलेल्या जागेवर बस्थानकाच्या जागेचा ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आता भाविकांना (Devotees) सप्तशृंगी गड येथे सुसज्ज व सुंदर असे बसस्थानक पाहायला मिळणार असून सप्तशृंगी गडावर लवकरच बसस्थानकाचे काम सूरु व्हावे यासाठी भाविक व ग्रामस्थ प्रतीक्षेत आहे. .

शिवालय नजीक बसस्थानक मंजूर झाले असून यासाठी जागा देण्याचा निर्णय आज ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच हे बसस्थानक झाल्यास येथील आदिवासी व इतर समाजाला उदरनिर्वाहसाठी चालना मिळेल. त्यामुळे आज विशेष ग्रामसभा घेत जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून बसस्थानक लवकरात लवकर व्हावे यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करून पाठपुरावा करण्यात येईल.

रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगी गड,

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com