जिल्हयातील 'इतक्या' ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा

जिल्हयातील 'इतक्या' ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेल्या व हागणदारीमुक्त अधिक गावाबाबतचे निकष पूर्ण करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील १६९ ग्रामपंचायतींना (Grampanchayat) हागणदारीमुक्त अधिकचा (ODF+) दर्जा मिळाला आहे...

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी या गावांचे अभिनंदन केले असून या गावांनी आदर्श गावाकडे वाटचाल करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Government) पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात गाव हागणदारी मुक्त करण्यावर भर देण्यात आला होता. यात प्रामुख्याने वैयक्तिक शौचालय बांधकामे मोठया प्रमाणात करण्यात आली. २०१९ मध्ये देश हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ODF +) ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. प्रत्येक गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करणे यासारखी कामे करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर सदर गावाला हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मानांकनाचा दर्जा प्रदान करणे करिता विविध निकषांची पूर्तता करून गावे टप्प्या टप्प्याने हागणदारीमुक्त अधिक घोषित करायची आहेत.

हागणदारीमुक्त अधिक गावांचे तीन प्रकार असून उदयमान (ASPIRING) , उज्जल (RISING) व उत्कृष्ट (MODEL) या प्रकारात गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून जाहिर करण्यात येत आहे. जिल्हयातील हागणदारीमुक्त अधिक घोषित केलेल्या १६९ गावांपैकी १६१ गावांनी उत्कृष्ट (MODEL) गावाचा दर्जा प्राप्त केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी दिली. या गावांमध्ये घरगुती स्तरावरुनच कचरा वर्गीकरण करण्याबाबत काम करण्यात येणार असून ४० गावांची कार्यशाळाही जिल्हास्तरावर घेण्यात आली आहे.

जिल्हयात यावर्षी ७१० गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात येत असून गावांचे आराखडे तयार करणे, प्रशासकीय मान्यता देणे याबाबतची कामे करण्यात येत आहेत.

जिल्हयातील 'इतक्या' ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा
मविप्र निवडणूक : प्रगती-परिवर्तनमध्ये सरळ लढत; 'यांचा' पत्ता कट

पावसाळ्यानंतर सर्व गावांमध्ये काम सुरु होणार असून सदरची गाव देखील मार्च २०२३ पर्यत हागणदारीमुक्त अधिक करण्याचे नियोजन असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

जिल्हयातील 'इतक्या' ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा
पावसाने विश्रांती घेताच 'पुष्पा गॅंग' सक्रीय; मध्यरात्री 'अशा' ठोकल्या बेड्या

हागणदारीमुक्त अधिक (ODF +) गाव करण्यासाठी गटविकास अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सल्लागार, तालुकास्तरावरील गटसमन्वयक, समूह समन्वयक, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत कंत्राटी अभियंते यांनी परिश्रम घेतले.

जिल्हयातील 'इतक्या' ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा
नाशिक-औरंगाबाद रोडवर छोटा हत्ती-स्कूल बसची जोरदार धडक; दोन गंभीर

तालुकानिहाय हागणदारीमुक्त अधिक घोषित गाव पुढीलप्रमाणे

बागलाण-२३,

चांदवड-६,

देवळा-१,

दिंडोरी-५,

इगतपूरी-७,

कळवण-१२,

मालेगाव-३,

नांदगाव-८,

नाशिक-१४,

निफाड-१२,

पेठ-२०,

सिन्नर-४,

सुरगाणा-३८,

त्रंबकेश्वर-१२,

येवला-४.

जिल्हयातील 'इतक्या' ग्रामपंचायतींना ‘हागणदारीमुक्त अधिक’चा दर्जा
छगन भुजबळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतात तेव्हा...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com