ग्रामपंचायत घेणार सहा महिन्यातील प्रसुती व शस्त्रक्रियांची माहिती

ग्रामपंचायत घेणार सहा महिन्यातील प्रसुती व शस्त्रक्रियांची माहिती

अंबासन । वार्ताहर Ambasan

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health center) अनेक रूग्णांकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी (Family planning surgeries) संबंधितांनी पैसे उकळल्याची चर्चा होत आहे. नुकत्याच उघड झालेल्या धक्कादायक प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी (District level inquiry) समितीने सखोल चौकशी केली असून आरोग्य विभागाकडून (Department of Health) काय कारवाई होते; याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

शासकीय रुग्णालयात (Government Hospital) रूग्णांसाठी अनेक सुविधा मोफत पुरविल्या जातात. मात्र ग्रामीण भागात आजही नागरीक अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. अंबासन (ता. बागलाण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकताच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी रूग्णाकडून पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिंचवे येथील योगिता जाधव या महिलेच्या धाडसामुळे आरोग्य केंद्रात रूग्णांकडून पैसे उकळणार्‍यांचा भांडाफोड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनही अ‍ॅक्शन मोडवर आल्याने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. ग्रा.पं. प्रशासनाकडून आरोग्य केंद्रात गेल्या सहा महिन्यांपासून झालेल्या शस्त्रक्रिया व प्रसुती झालेल्या महिलांच्या आकडेवारीसह त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती संकलित करून चौकशी केली जाणार असल्याची माहिती सरपंच व सदस्यांनी दिली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरकारभारामुळे गावाची प्रतिमा मलीन होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचे ग्रा.पं. सदस्यांनी सांगितले. संबधितांनी अजून किती रूग्णांकडून पैसे उकळले याबाबत माहिती संकलित होताच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. आरोग्य केंद्रात चौकशीसाठी आलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. युवराज देवरे यांनाही ग्रा.पं. सदस्यांनी निवेदन दिले असून त्यात काही नावे दिली आहेत. आता या प्रकरणी आरोग्य विभागाकडून काय कारवाई होते; याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, अंबासन आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी अधिकार्‍यांकडून रूग्णांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. अशा गोष्टींमुळे आरोग्य सेवा आणि शासनही बदनाम होते. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करत दोषींना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य शशीकांत कोर यांनी केली आहे

प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांकडून पैसे उकळले जाणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. आरोग्य विभागाने कठोर कारवाई करावी. आम्ही सहा महिन्यात झालेल्या शस्त्रक्रिया व प्रसुती झालेल्या महिलांची यादी घेऊन चौकशी करणार आहोत.

राजसबाई गरूड सरपंच, अंबासन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com