ग्रामपंचायतींच्या मतदानास सुरुवात; मतदारांमध्ये उत्साह

ग्रामपंचायतींच्या मतदानास सुरुवात; मतदारांमध्ये उत्साह

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या मतदानास (Gram Panchayat) आज सकाळपासून सुरुवात झाली असून सगळीकडे सुरळीतपणे मतदान (Voting) सुरु आहे...

यामध्ये इगतपुरीतील ५, सुरगाणा ६१, त्र्यंबकेश्वर ५७, पेठ ७१ इतक्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून मतदानावेळी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सकाळी ९.३० वाजेपर्यत सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) ५९ ग्रामपंचायतींसाठी १२ टक्के तर पेठ तालुक्यातील (Peth taluka) ग्रामपंचायतींसाठी २१.२७ टक्के मतदान झाले होते. तसेच आज मतदान झाल्यानंतर उद्या (१७) मतमोजणी होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com