ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर; विजयी उमेदवारांचा जल्लोष

ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर; विजयी उमेदवारांचा जल्लोष

सटाणा । प्रतिनिधी | Satana

तालुक्यातील 13 पैकी 3 ग्रामपंचायती (gram panchayat) यापूर्वी बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 10 ग्रामपंचायतींसाठी मतदान (voting) होऊन आज (दि. 5) सकाळी 10 वाजता तहसील परिसरात मतमोजणी (vote counting) झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जितेंद्र इंगळे (Election Returning Officer and Tehsildar Jitendra Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शासकीय अधिकार्‍यांनी मतमोजणी प्रक्रिया (Vote counting process) पार पाडली.

ग्रामपंचायत (gram panchayat) पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यापूर्वी तालुक्यातील साळवण, देवपूर (चाफापाडा) व करंजखेड या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. सद्यस्थितीत बोरदैवत, बुंधाटे, बोर्‍हाटे, भिलदर, दसवेल, अंतापूर, वाठोडा, बाभुळणे, भावनगर, साकोडा आदी ग्रामपंचायतींसाठी मतदान (voting) होऊन नवोदितांनी प्रस्थापितांवर वर्चस्व निर्माण केल्याची स्थिती आहे. मतदान व मतमोजणी काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती सटाणा पो.नि. सुभाष अनमूलवार व जायखेडा सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी दिली.

तालुक्यातील 13 पैकी यापूर्वी बिनविरोध झालेल्या 3 ग्रामपंचायती व नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. साळवण : रामा बागुल, भारती ठाकरे, अनुसया भानसी, जिजाबाई अहिरे, काळू सोनवणे, रमेश चौरे. देवपूर (चाफापाडा) : दिलीप जगताप, कमल बागुल, नर्मदा गांगुर्डे, कौस्तुभ बागुल, दत्तू जगताप, (दोन जागा रिक्त). करंजखेड : लक्ष्मण देशमुख, आत्माराम चौरे, कांताबाई देशमुख, संगीता सोनवणे, रंजना सोनवणे, हिराचंद निकम, (एक जागा रिक्त).

ग्रामपंचायतींचा निकाल व विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

बाभुळणे : सुक्राम पवार, शिवाजी माळीस, बेबीबाई माळी, पोपट चौरे, कल्पना कामडी, योगिता महाले, धावल्या चौरे, मीना राऊत, अंजना वाघ.

वाठोडा : छबी बहिरम, सदा जाधव, नवनाथ ठाकरे, इंदिरा ठाकरे, महादू कांबडी, संजय ठाकरे, सुनीता सूर्यवंशी.

साकोडे : दशरथ बागुल, संगीता गायकवाड, सरला देशमुख, रामदास मोरे, दत्तू गायकवाड, मीना पवार, सविता मोरे.

अंतापूर : शरद खैरनार, रेखा साबळे, सुशीला गवळी, किरण सोनवणे, मदन खैरनार, सरला बागुल, दावल ब्राम्हणे, सुनील गवळी, मीरा मानकर, संतोष पवार, मिना बोरसे, सुरेखा पवार, विलास ब्राम्हणे, रत्ना पानपाटील, आशा पवार.

भावनगर : आप्पा ठाकरे, सुमित्रा ठाकरे, किरण पालवी, सारिका देशमुख, गणेश ठाकरे, कविता गवळी, हिरुबाई बहिरम .

दसवेल : संदीप निकम, रितू पवार, सुमन पवार, ज्योती निकम, योगेश पवार, दर्शना सोनवणे, रामचंद्र भामरे.

भिलदर : गोरख चौधरी, अनिता बहिरम, रंजना भोये, दत्तू गायकवाड, बापू गावित, सोनाबाई पवार, मोहनाबाई चौरे.

बोरदैवत : राजू माळी, रवींद्र पवार, रामदास माळीस, इंदूबाई चौधरी, अनिता चौधरी, काळू चौधरी, काळू पवार, आक्काबाई पवार, अनिता महाले.

बुंधाटे : किशोर बागुल, कैलास गायकवाड, मीना गांगुर्डे, गुलाब ठाकरे, वैशाली ठाकरे, शोभा बहिरम, अनिता चव्हाण, रंगनाथ सोनवणे, आशा गायकवाड.

बोर्‍हाटे : धनजी बर्डे, तात्या चौरे, माया बहिरम, शारदा सूर्यवंशी, अर्चना सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, राजू चौधरी, वैशाली सूर्यवंशी, सुवर्णा बर्डे.

अंतापूर येथील विजयी पॅनलचे नेते बंडू गवळी यांनी निवडणुकीत विजयश्री प्राप्त केल्याशिवाय दाढी काढणार नाही, असा निश्चय केला होता तर भावनगर ग्रामपंचायतीत सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम देशमुख यांच्या स्नुषा सारिका देशमुख केवळ एक मताने विजयी झाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com