ग्रा. पं. सदस्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यावा

ग्रा. पं. सदस्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यावा

कळवण । प्रतिनिधी Kalwan

नुकत्याच होऊ घातलेल्या बाजार समिती (market committee) निवडणुकीत (election) प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार (Right to vote) द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे (memorandam) शिवसेना (shiv sena) तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांच्याकडे केली आहे.

कळवण तालुक्यात (kalwan taluka) 22 ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा निवडणूक कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायत कारभार चालविण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कळवण तालुक्यात बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. दि 16 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून दि 17 जानेवारी 2022 रोजी मतदान (voting) तर दि 18 जानेवारी मतमोजणी होणार आहे.

मात्र या निवडणुकीत तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीचे सदस्य मतदानापासून वंचीत राहणार आहे. ज्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत, अशा ग्रामपंचायतींच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा अथवा बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक करून निवडणूक पुढे ढकलून आधी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक घ्याव्यात जेणेकरून

वंचित ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे मतदान यादीत (voting list) समाविष्ट होईल व त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, माजी अर्थ व बांधकाम सभापती रवींद्र देवरे, संचालक शितलकुमार अहिरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com