ग्रामपंचायत सदस्याची उपसरपंचाला मारहाण; 'हे' आहे कारण

ग्रामपंचायत सदस्याची उपसरपंचाला मारहाण; 'हे' आहे कारण
USER

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

उपसरपंचपदाचा (Deputy Sarpanch Post) राजीनामा (Resignation) दे व मला उपसरपंच बनू दे अशी कुरापत काढून ग्रामपंचायत सदस्याने उपसरपंचाला मारहाण (Beating) केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील खंबाळे (Khambale) येथे घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, खंबाळे येथे ग्रामसभेच्यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण चौधरी (Gram Panchayat Member Narayan Chaudhary) यांनी उपसरपंच दिलीप चौधरी (Dilip Chaudhary) यांना उपसरपंचपदाचा राजीनामा दे व मला उपसरपंच बनू दे अशी कुरापत काढून मारहाण केली.

त्यानंतर उपसरपंच दिलीप चौधरी यांनी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) सदस्य नारायण चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.तसेच दिलीप चौधरी यांनी खंबाळे गावात गावअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते, स्मशानभूमी व गटारी आदी विकासकामे केली असून सरपंचासहीत उर्वरीत सदस्य त्यांच्या बाजूने आहेत.

दरम्यान, विकासकामांचा राग मनात धरुन ग्रामपंचायत सदस्य नारायण चौधरी यांनी वारंवार उपसरपंचपदाचा राजीनामा दे अशी मागणी केली. पंरतु, राजीनामा देण्यास मी नकार दिल्याने सदस्य चौधरी यांनी कुरापत काढून मला मारहाण केली,असे उपसरपंच चौधरी यांनी सांगितले. तसेच मी माझ्या काकाला कधीही मारहाण केली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com