येवला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींंसाठी 'इतके' टक्के मतदान

येवला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींंसाठी 'इतके' टक्के मतदान

येवला | प्रतिनिधी Yeola

येवला तालुक्यातील (Yeola Taluka )महत्त्वपूर्ण असलेल्या सात ग्रामपंचायतचे मतदान आज शांततेत संपन्न झाले आहे सदरचे मतदान शांततेत संपन्न होण्यासाठी पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन यांनी परिश्रम घेऊन मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पाडली यामध्ये कुसूर येथे एकाच वार्डासाठी मतदान घेण्यात आले होते या वार्डात एकूण 504 मतदारांपैकी 436 मतदान झाले असून येथील मतदानाची टक्केवारी 86.51 इतकी राहिली.

यानंतर चांदगाव येथील तिन्ही वार्डासाठी मतदान झाले असून 937 मतदारांपैकी 838 मतदारांनी आपला हक्क बजावला येथे 89.43 इतकी टक्केवारी राहिली आहे यानंतर एरंडगाव बुद्रुक या ठिकाणी 772 पैकी 723 मतदारांनी आपला हक्क बजावत येथील मतदानाची टक्केवारी 93.65 इतकी राहिली आहे नांदेसर येथे 668 मतदारांपैकी 617 इतके मतदान झाले येथील टक्केवारी 92.37 इतकी राहिली यानंतर आडगाव चोथवा ही लक्षवेधी ग्रामपंचायत ठरली असून येथील एकूण 1525 पैकी 1386 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथील टक्केवारी 90.89 इतकी राहिली यानंतर कोटमगाव बुद्रुक या ठिकाणी 830 मतदारांपैकी 776 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथील आकडेवारी 93.49 इतकी राहिली त्यानंतर नायगव्हाण येथील 912 मतदारांपैकी 860 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत सर्वाधिक टक्केवारी 94.30 नायगव्हाण येथील राहिली.

एकूण ग्रामपंचायतचे मतदान पाहता सरासरी 90% पर्यंत मतदानाचा आकडा गेला असून येत्या मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये मतमोजणीची प्रक्रिया संपन्न होणार आहे मतदार राजा आता सत्ताधाऱ्यांना कौल देणार की नव्या उमेदवारांना संधी देणार हे आता येणाऱ्या मंगळवारी स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com