ग्रामपंचायत निवडणूक: प्रचारानंतर मतदार भेटीस चढाओढ

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

पालखेड बंधारा । वार्ताहर | Plakhed

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या निवडणुका (election) होत असल्याने या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उमेदवारांनी वेगवेगळे फंडे आजमावले मात्र शेवटचे दोन दिवस उमेदवार व समर्थक यांचे पावसामुळे (rain) हाल पाहवयास मिळाले.

सततधार व मुसळधार पावसामुळे (heavy rain) प्रचार फेरी व बैठक घेणे कठीण झाले होते. त्यातच आधीच निवडणुकीची (election) हाऊस त्यात पडतोय पाऊस अशी अवस्था पाहावयास मिळाली. मात्र आता या प्रचारांच्या तोफा थंडावल्याने मतदानाची तारीख जवळ आल्याने उमेदवार आता मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत आहे.

मागच्या गेल्या काही दिवसांमध्ये गावागावात तसेच शहरात फिरणार्‍या प्रचाराच्या गाड्या व लाऊडस्पीकर (Loudspeaker) या मार्फत करण्यात येणार्‍या प्रचाराने नागरिकांना मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत होते

त्यावरची गाणी किंवा प्रचाराचे मुद्दे सोशल मीडियाद्वारे (social media) व्हिडिओ (video) जाहीरनामे यामुळे निवडणुकांची चांगलीच चर्चा होत होती. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड व कोणता उमेदवार (candidate) निवडून येणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते. तालुक्यातील मोहाडी (mohadi), जानोरी (janori), जळकेदिंडोरी, करंजवण, जुने धागूर, निगडोळ, अंबानेर, धारूर, वरखेडा, कसबेवणी, पिंपळनारे, मडकीजाब, टिटवे, खतवड या ग्रामपंचायतीच्या व इतरही ग्रामपंचायतच्या निवडणुका

राजकीय, सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जात असल्याने या ग्रामपंचायती ची सत्ता कोणाकडे जातात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. हे मात्र येणारा काळच ठरवणार असून त्याबाबतचे चित्र दि.19 सप्टेंबरला निकालानंतरच स्पष्ट होणार असल्याने यासाठी संबंधित विभागाने नियोजन केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com