
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka )6 ग्रामपंचायतीसाठी ( Grampanchayat Elections)मतदान झाले. दिंडोरी तालुक्यात एकूण ८६.२६% मतदान झाले असून मंगळवारी लागणार्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उमेद्वारांना प्रचारासाठी दमछाक झाली होती. कोकणगाव खुर्द, जालखेड, रामशेज / मानोरी, निळवंडी, वनारवाडी, उमराळे बु. या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवसांनंतर सरपंचपदासाठी 20 उमेद्वार रिंगणात उभे आहेत सदस्यपदासाठी 71 उमेद्वार रिंगणात उभे असून यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सदस्यपदासाठी 22 जागा बिनविरोध झाल्या तर सरपंचपदासाठी 1 जागा बिनविरोध झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले होते. शक्यतो ग्रा.पं. निवडणुका स्थानिक पातळीवर राजकीय पक्षविरहीत लढवल्या जात असल्या तरी कोणता गट कुठे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावागावांत सत्ता स्थापनेसाठी संघर्ष बघावयास मिळत आहे. यंदा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असून सरपंचाला सर्वस्व अधिकार प्राप्त झाले असल्याने त्याबाबत अतिदक्षता घेण्यात आली. मतदारांनी मतदानासाठी दिलेला कल कुणाला तारणार याची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे. उद्या दि. 20 रोजी 12 वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचा निकाल हाती लागणार असल्याने विजय उत्सव साजरा करण्यासाठी कार्येकर्ते सज्ज झाले आहे. अपंग व्यक्तींना मतदानासाठी घेऊन येण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून येत होती.
गावनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी
उमराळे बु.=82.8%
रामशेज=90%
निळवंडी=86.5%
जालखेड=83%
वनारवाडी=88.2%
कोकणगाव खु.=86.7%
एकूण दिंडोरी तालुका टक्केवारी=86.26%