ग्रामपंचायत निवडणूक : सुरगाणा तालुक्यात 'इतके' अर्ज प्राप्त

ग्रामपंचायत निवडणूक : सुरगाणा तालुक्यात 'इतके' अर्ज प्राप्त

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ( Surgana Taluka Grampanchayat ) २१ तारखेपासून सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज सादर करण्याचे काम सुरु होते.

अर्ज सादर करतांना अनेकांना अर्जा सोबतची कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी दमझाक झाली आज अखेर सरपंचांच्या ६१ जागांसाठी २८६ तर सदस्य पदासाठी ११६८ असे १४५४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

२८ सप्टेंबर रोजी आलेल्या अर्जाची छाननी होणार असून उर्वरित माघारी नंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात हे कळणार आहे.शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी ७०८ तर सरपंच करीता १६५ असे सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com