Nashik News : धान्य व्यापार्‍याची लाखो रुपयांची फसवणूक

fraud
fraud

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील इंदिरानगर भागात (Indiranagar Area) राहणार्‍या एक्सपोर्टच्या व्यावसायिकाला पश्चिम बंगालच्या (West Bengal) एका व्यापार्‍याने तब्बल ८ लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

fraud
Nashik Road News : नानेगावला बिबट्या जेरबंद; पाहा Video

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरजकुमार चौधरी (रा. सिलीगुडी बाजार, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे फसवणूक (Fraud) करणार्‍या संशयिताचे नाव असून याप्रकरणी नारायण बापू चांदवडकर (रा. नंदनवन सोसायटी, श्रद्धाविहार कॉलनी, इंदिरानगर) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

fraud
Video : त्र्यंबकेश्वरला बिबट्या जेरबंद

चांदवडकर यांचा धान्य (Grain) खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ (Rice) खरेदीसाठी ऑनलाइन सर्च केले. त्यावेळी त्यांना पश्चिम बंगालमधील संशयित चौधरी याचा फोन नंबर मिळाला. त्याच्याशी फोनवरुन झालेल्या संवादातून दोघांमध्ये ३५ टन तांदळाचा व्यवहार ठरला. त्यानुसार चांदवडकर यांनी चौधरीला ८ लाख ५२ हजार १०० रुपये ऑनलाईन पाठविले.

fraud
Nashik Sinnar News : महामार्गालगतच्या नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय

त्यानंतर तांदूळ चांदवडकर यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. यानंतर त्यांनी पुन्हा संपर्क साधला असता त्यांना संशयिताने (suspect) उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरुन चांदवडकर यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार २० ऑगस्ट ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत घडला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

fraud
Nashik News : विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com