'इ पॉस' मशीनवर धान्य वितरण सुरूच राहणार

'इ पॉस' मशीनवर धान्य वितरण सुरूच राहणार

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार (grain shopkeeper) व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे (Kerosene Licensee Federation Pune), यांच्यावतीने

राज्यातील रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांनी दि. 7, 8 व 9 फेब्रुवारी रोजी 'इ पॉस मशीन'वर (e POS Machine) धान्य वितरण (grain distribution) करणार नाही असे आवाहन केले आहे.

मात्र, या मात्र पुणे महासंघाच्या या आंदोलनात (agitation) नाशिक जिल्ह्यातील (nashik district) फेडरेशनचे दुकानदार सहभागी होणार नाहीत, असे ऑल महाराष्ट्र फेडरेशन, नाशिकतर्फे महाराष्ट्र फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे, उपाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी नाशिक जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात (memorandum) म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील आमच्या फेडरेशनला संलग्न असलेले सर्व जिल्हा, शहर, तालुका संघटना व परवानाधारक (License holder) कोणीही सामील होणार नसून दि. ७,८ व ९ फेब्रुवारी रोजी नियमितपणे धान्य वितरण करणार आहे.निवेदनावर ढवळू फसाळेफारुख शेख, माधव गायधनी, दिलीप नवले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com