
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
धान्य वितरण कार्यालयाचा (Grain Distribution Office) कारभार रामभरोसे सुरू आहे. अधिकारी, कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे बहुतांशी लाभार्थी शिधापत्रिकेवरील (Ration cards) स्वस्त धान्यापासून वंचित राहत असल्याच्य तक्रारी वाढल्या आहेत.
स्वस्त धान्य वितरणाचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय असताना अधिकार्यांच्या नजरेखाली असल्याने कार्यालयाचे काम बहुतांशी प्रमाणात सुरळीत होते. नाशिकरोड (nashik road) येथील शासकीय जागेत धान्य वितरण कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर तेथील कारभार अतिशय आलबेल सुरू आहे. अधिकारी, कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदारांकडून मनमानी कामे केली जात आहेत. बहुतांशी वेळेस अधिकारी जागेवर सापडत नाहीत.
त्यामुळे नागरिकांना माघारी परतावे लागते. कर्मचार्यांकडून कुठल्याही प्रकारची कामे करण्यास टाळाटाळ केली जाते. नवीन शिधापत्रिका (Ration cards) तयार करणे, सदस्यांची नावे वाढविणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, अशी सर्व कामे प्रलंबित ठेवली जातात. नागरिकांकडून विचारणा केली असता, वरिष्ठांकडे बोट दाखविले जाते. बर्याच नागरिकांना अनेक वर्षांपासून शिधापत्रिका मिळालेली नाही.
कार्यालयाचे उंबरठे झिजवून अर्जदार त्रस्त झाले आहेत. शिधापत्रिकेत सदस्यांचे नाव वाढविण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. एक दिवसापेक्षा अधिक वेळ लागत नाही. अधिकारी गैरहजर किंवा सुटीवर असतील, तरच एकापेक्षा अधिक दिवस लागत असतात. असे असताना वर्षांनुवर्षे अर्ज करूनही शिधापत्रिकेत नावे वाढविली जात नाहीत.
दुसरीकडे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात धान्य आणावयास गेल्यास, त्यांना शिधापत्रिकेत (Ration cards) वाढविलेल्या सदस्यांची नावे नसल्याने धान्य दिले जात नाही. कार्यालय पुन्हा जिल्हाधिकारी आवारात आणल्यास नागरिकांना होणारा त्रास वाचणार आहे. शिवाय अधिकारी, कर्मचार्यांवर वरिष्ठ अधिकार्यांचा वचक निर्माण होण्यास मदत होईल.
दिव्यांगांची दिशाभूल
दिव्यांग बांधव धान्यापासून वंचित असल्याचे दिव्यांग संघटनेने म्हटले आहे. पुरवठा अधिकार्यांना भेटून नुकतेच निवेदन दिले होते. मात्र, दिव्यांगांना अजूनही धान्य मिळत नसून दिव्यांगाची परवड थांबवावी, यासाठी आंदोलन उभे केले जाणार असल्याचे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे ललित पवार यांनी सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकार्यांना 50 वंचित दिव्यांगांची यादी देण्यात आली.
त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून धान्य वितरण अधिकार्यांना यादी देऊ केली आहे. यासंदर्भात तत्काळ अंत्योदय योजनेत समावेश करून त्यांना धान्य वितरण करण्याची कार्यवाही करण्यास सांगितले. मात्र, धान्य शहर वितरण अधिकारी दोन वर्षे उलटूनही एकाही दिव्यांग व्यक्तीस लाभ दिला नाही. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे े ललित पवार यांनी सांगितले.