नाशिकमध्ये भरड धान्य पाककृती स्पर्धा संपन्न

नाशिकमध्ये भरड धान्य पाककृती स्पर्धा संपन्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सामान्य नागरिकांच्या मनात भरड धान्याच्या (grain) उपयुक्ततेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी येथील स्वातंत्र्यलक्ष्मी राणीलक्ष्मीबाई स्मारक समिती (राणी भवन) यांच्या तर्फे भरड धान्य पाककृती स्पर्धा झाल्या.

बक्षीस वितरण समारंभात आहार अभ्यासक डॉ सुनीता पिंपळे (Dietitian Dr. Sunita Pimple) म्हणाल्या की, भरड धान्याच्या पौष्टिक पाककृतींचा प्रसार झाला तरच भारतीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी काही ठोस काम करणे शक्य आहे.

हवामान बदलाला सहज तोंड देऊ शकणारी, जीवनशैली आजारांना काबूत ठेवू शकणारी, कमी उत्पादन खर्च लागणारी आणि सेंद्रीय शेतीचा (Organic farming) आधार असणारी भरड धान्ये म्हणजे जादुई धान्ये आहेत.

आपल्या पूर्वजांच्या आहारामध्ये हीच धान्ये मुख्यतः वापरली जात. जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे आपल्या निर्यातीवर परिणाम होईल. शिवाय आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला अन्नधान्याची चणचण भासते आहे.

बदलत्या परिस्थितीत अशी आयात नुसतीच खर्चिक नसून दिवसेंदिवस अवघड होते आहे. त्यामुळे आपल्या देशातील अन्नधान्याची वाढती मागणी भरड धान्याच्या रूपाने भरून काढता आली तर अन्नसुरक्षेचा (Food security) प्रश्न मार्गी लावता येईल. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या  प्रेरणा बेळे, डॉ शुभांगी कुलकर्णी, मंगल सोंदांकर, विद्या चिपळूणकर यांचे भाषण झाले.  डॉ रचना खांडवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.                             

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com