
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ (Nashik Division Graduate Constituency) निवडणुकीचे (election) मतदान (voting) ३० जानेवारी, २०२३ रोजी होणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी (Final voter list) जाहीर झाली असून नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार (voter) आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली.
विभागात सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) आहेत. अहमदनगरमध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात (nashik district) ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यत ३५ हजार ५८, धुळे जिल्ह्यात २३ हजार ४१२, नंदूरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ इतके मतदार आहेत.
विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे
नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही (Polling stations) संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.