शासनाचे बेरोजगार युवकांकडे दूर्लक्ष: छत्रपती संभाजीराजे

शासनाचे बेरोजगार युवकांकडे दूर्लक्ष: छत्रपती संभाजीराजे

ठाणगाव । वार्ताहर | Thangaon

राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचा (Unemployment) प्रश्न बिकट होत आहे. तरुणांना नोकर्‍या (Jobs for youth) उपलब्ध नाही.

अशा परिस्थितीत सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वराज संघटनेच्या युवक एकत्र होत असून छत्रपतींच्या स्वप्नातले स्वराज्य स्थापन करण्यास खर्‍या अर्थाने सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन माजी खासदार संभाजीराजे भोसले (Former MP Sambhaji Raje Bhosale) यांनी केले.

जनसेवा सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपिंठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje), स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर, सोनांबेचे सरंपच डॉ. रविंद्र पवार, कदम आदी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकर्‍यांचे (farmers) कंबरडे मोडले असून सरकारकडून त्यांना अद्याप अपेक्षित मदत नाही. शेतकरी संकटात असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे यांच्या सिन्नर तालुका (sinnar taluka) दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते.

दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांच्या हस्ते स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर संभाजीराजे यांचे ठाणगाव (Thangaon) येथे आगमन झाले. यावेळी जनसेवाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला संभाजीराजे यांच्या हस्ते गावात स्वराज संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यानंतर ग्रामस्थांच्यावतीने संभाजीराजेंची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. जनसेवाच्यावतीने यावेळी बसस्थानक परिसरात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्यावतीने जनसेवाचे मुकुंदराव संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, सरपंच सीमा शिंदे, माजी सरपंच नामदेव शिंदे, विकास सोसायटीचे चेअरमन अमित पानसरे यांच्याकडून संभाजीराजे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सभेत बोलताना संभाजीराजे यांनी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. सिन्नर तालुक्यातील युवकांचा प्रतिसाद हा अविस्मरणीय असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अर्जुन आव्हाड, वसंत आव्हाड, संजय शिंदे, शंकर सागर भोर, सचिन रायजादे, भगवान शिरसाठ, गणेश शिंदे, प्रतीक शिंदे, विशाल काकड, योगेश शिंदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com