मोहाडीच्या सचिन नेहरेंचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

मोहाडीच्या सचिन नेहरेंचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

जानोरी | Janori

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सचिन बाळासाहेब नेहरे यांचा राज्यपालांच्या हस्ते कोविडयोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला आहे.

नेहेरे हे सध्या मुंबई महानगर पालिकेत सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आहेत. नेहेरे यांना कोविड -१९ च्या महामारीत मुलुंड टी विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या केलेल्या सेवा कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे राजभवन मुंबई येथे कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते (ता.१८) नेहरे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुलुंडचे आमदार महीर कोटेचा,सामाजिक कार्यकर्ते होरा उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com