राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे नाशकात आगमन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे नाशकात आगमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचे नुकतेच नाशिक (ओझर) विमानतळावर आगमन झाले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.....

यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले.

त्यानंतर राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात (MUHS) आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रवाना झाले.

Related Stories

No stories found.