करोनामुळे निधन : मदतीसाठीचे 'इतके' अर्ज मंजूर

करोना
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) व परिसरात करोनामुळे (Corona) निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान (subsidy) प्रदान करण्यासंदर्भातील एक हजार सातशे दोन अर्जांना महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून (Health Department) मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, अद्यापही सात हजार अर्ज प्रलंबित आहेत...

शासन निर्देशांनुसार करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास 50 हजारांचे सानुग्रह अनुदान सहायक राज्य आपत्ती मदत निधीमधून (Fund) प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार नाशिक महापालिकेने (Nashik NMC) शहरातील सहा विभागात सहा नोडल अधिकार्‍याची नियुक्ती केली असून शासन निर्देशाप्रमाणे अर्ज सादर करून घेणे. त्यांची तपासणी करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

करोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांकडून आतापर्यंत आठ हजार अर्ज (Application) दाखल करण्यात आले असून, त्यापैकी जवळपास 1702 अर्जांची छाननी करून त्यांना मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

सानुग्रह अनुदानासाठी अर्ज दाखल करताना अर्जदाराने स्वतःचा तपशील, आधार क्रमांक, असून, शासन निर्देशाप्रमाणे अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, अर्ज सादर करून घेणे, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, तपासणी करण्याबाबतच्या सूचना, मृत्यू प्रमाणपत्र, नाहरकत स्वयंघोषणापत्र अर्जासोबत करोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीचा दाखल सदर करणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यात करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा हा 8 हजार 740 झाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) नाशिकमध्ये हाहाकार माजवला. रुग्णालयात जागा नाही. ज्यांना जागा मिळाली त्यांना ऑक्सिजन नाही. ज्यांना ऑक्सिजन मिळाले त्यांना औषध नाही, अशी गत होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com