शासकीय योजनांचा लाभ घ्या: कृउबा सचिव देसले

शासकीय योजनांचा लाभ घ्या: कृउबा सचिव देसले

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाने (central government) जाहीर केलेल्या कृषिविषयक योजनांचा (Agricultural schemes) शेतकर्‍यांनी (farmers) लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक देसले (Ashok Desale, Secretary, Agricultural Produce Market Committee) यांनी केले.

येथील कृउबा आवारात कृषी पणन मंडळाच्या सूचनेनुसार केंद्र शासनाच्या ‘अन्नदाता देवो भव, किसान भागिदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेंतर्गत शेतकरी मेळावा (Farmers meet) आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना कृउबा सचिव देसले बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत राष्ट्रीय कृषी बाजार (National Agricultural Market),

केंद्रीय क्षेत्र, नवीन शेतकरी उत्पादक संस्थांची निर्मिती, कर्जाशी निगडीत कृषी पणन, किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card), शेतकरी अपघात विमा (Farmer Accident Insurance), शेतकरी सन्मान, किसान मानधन (Farmer's honorarium), किसान ई-कार्ड (Kisan e-card), ई-बाजार (E-marketplace), पशूधन विकास, प्रधानमंत्री पीक विमा (Prime Peak Insurance) आदी योजना राबविल्या जात आहेत.

शेतकर्‍यांनी या योजनांचा लाभ कसा घ्यावा; याबाबत देसले यांनी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. योजनांच्या लाभासंदर्भात कुठल्याही अडचणी आल्यास कृउबा शेतकर्‍यांना मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी लेखापाल कमलेश पाटील, सहाय्यक सचिव प्राजक्ता वाडीकर, शेतकरी, व्यापारी, हमाल-मापारी कामगार व कृउबा कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.