..अन् आदेश मिळताच वीरमातेचे अश्रू अनावर

..अन् आदेश मिळताच वीरमातेचे अश्रू अनावर

शहिदांच्या कुटुंबियांना शासकीय कोट्यातून जमीन मंजूर

नाशिक। प्रतिनिधी Nashik

वेळ सकाळी १० वाजेची.. जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office Nashik) स्वतः जिल्हाधिकारी यांनी पाहुण्यांना आमंत्रित करून राखीव वेळ ठेवली होती. लागलीच अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे आणून त्यावर जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी सही केली आणि तो आदेश पाहुण्यांमध्ये उपस्थित असलेल्या वीरमाता किसनाबाई बोडके यांच्या हाती दिला....

..अन् आदेश मिळताच वीरमातेचे अश्रू अनावर
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात: नाशिक, नगरला यलो अलर्ट

आदेश हातात पडताच वीरमातेच्या डोळ्यातून अश्रू वाहण्यास सुरुवात झाली. हे अश्रू मुलगा शहीद झाल्याच्या दुःखाचे की शासनाने दखल घेत जमीन दिल्याच्या आनंदाचे हे त्या वीरमातेलाच ठावूक. अशा या भावूक प्रसंगात शहीद कुटुंबीय जिल्हाधिकारी मांढरे यांचे आभार मानण्यास सरसावले. मात्र, त्यांनी स्पष्टपणे आभाराला नकार देत आपल्या मुलाने सीमेवर रक्त सांडून देशावर उपकार केले आहेत. त्याच्या बदल्यात ही जमीन तुम्हाला शासन देत आहे. लवकरच इतरांचे प्रस्ताव देखील मंजूर होतील, असे प्रतिपादन केले.

..अन् आदेश मिळताच वीरमातेचे अश्रू अनावर
Photo : अतिसंवेदनशील मालेगावात असा होता बंदला प्रतिसाद

दिनांक २४ सप्टेंबर २००२ मध्ये जम्मू काश्मीर मधील दोडा जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत असताना शहीद श्रीकांत श्रीकृष्ण बोडके (Martyr Shrikant Shrikrishna Bodake) यांना वीरगती प्राप्त झाली. 'देशदूत'च्या वर्धापनदिनानिमित्त २००३ साली शहीद श्रीकांत बोडके यांच्या मातोश्री वीरमाता किसनाबाई बोडके यांना सन्मानित केले होते.

वीरमाता किसनाबाई आणि वीरपिता श्रीकृष्ण बोडके यांनी मोठ्या कष्टाने हा धक्का पचवला आणि आपला धाकला मुलगा किरण याला देखील देशसेवा करण्यासाठी प्रवृत्त केले. शहीद बोडके यांचा धाकला भाऊ किरण बोडके हे सध्या मुंबई येथे पोलीस कॉन्स्टेबल (Mumbai Police Constable) या पदावर कार्यरत राहून आपले कर्तव्य बजावत आहे. वीरमाता किसनाबाई यांना तेव्हापासून मानसिक धक्क्यांचा त्रास तर वीरपिता श्रीकृष्ण बोडके यांना अर्धबहिरेपण आले.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी आदेश प्रदान करतानाच जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम आम्ही हाती घेतली आहे. लवकरच आणखी प्रकरणे आम्ही निकाली काढणार आहोत, सिन्नर येथील वीर माता यांना जमीन मंजुरीचा आदेश सुपूर्त करताना शहीद जवानास योग्यरीत्या श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान आहे, असे प्रदिपादन केले.

वीरमाता किसनाबाई बोडके यांनी, शहीद झालेल्या माझ्या मुलाची नेहमीच आठवण येत असते. मुलाने जिवंतपणी आई वडिलांसाठी काही करणे हा तर नियमच आहे; मात्र माझा श्रीकांत स्वतः देशासाठी शहीद होऊन आमच्यासाठी एवढ करून ठेवलंय याचा अभिमान वाटतो. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार राजेंद्र नजन, स्वीय सहायक संतोष तांदळे, वरिष्ठ लिपिक दिनेश वाघ, लिपिक आदित्य परदेशी यांचे यावेळी आभार मानले.

Related Stories

No stories found.