मृत सेवकांच्या वारसांना शासनाकडून लाखोंचा अनुदान
USER

मृत सेवकांच्या वारसांना शासनाकडून लाखोंचा अनुदान

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

करोना (corona) उद्रेक काळात कर्तव्यावर असतांना बाधीत होवून मृत्यूमुखी पडलेल्या महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) पाच सेवकांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी 50 लाख रूपये रक्कमेचे सानुग्रह अनुदान मंजूर (grant sanctioned) झाले आहे. अडीच कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले असून त्याचे वाटप आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

शहरासह परिसरात पहिल्या व दुसर्‍या लाटेत करोनाचा उद्रेक होवून अक्षरश: हाहाकार उडाला होता. अशा बिकट परिस्थितीत देखील स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मनपा अधिकारी व सेवक जनतेस नागरी मुलभूत सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून सेवारत होते. स्वच्छता विभागाचे (Department of Sanitation) सेवक देखील जीव धोक्यात घालून दररोज स्वच्छतेचे काम करत होते. त्यामुळे अनेक अधिकारी व सेवकांना करोनाची बाधा झाल्याने उपचार घ्यावे लागले होते. या उद्रेक काळातच कर्तव्यावर असतांना मनपाच्या पाच सेवकांना करोनाची (corona) बाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेने मृत सेवकांचे संसार उघड्यावर पडले होते. राज्य शासनाच्या (state government) नगरविकास विभागातर्फे (Urban Development Department) करोना संकट काळात दगावलेल्या मनपा सेवकांच्या वारसांना 50 लाख रूपये अनुदान (Grants) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयावरून महानगरपालिकेतर्फे नगरविकास विभागाकडे मृत पाचही सेवकांच्या वारसांना 50 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येवून पाठपुरावा सातत्याने केला जात होता. मनपा प्रशासनातर्फे सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्यास अखेर यश येवून पाचही मृत सेवकांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांचे सानुग्रह अनुदान नगरविकास विभागातर्फे मंजूर करण्यात आले. सदर अनुदान मनपास प्राप्त झाले असून आयुक्तांच्या हस्ते धनादेशाचे वाटप केले गेले.

मृत सेवकांच्या बँकेच्या खात्यावर (bank account) अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. एका सेवकाच्या खात्याचा आयएफसी कोडची तांत्रिक अडचण उद्भवली असली तरी ती एका दिवसात दूर करण्यात येवून त्याच्या खात्यावर देखील रक्कम टाकली जाणार असल्याची माहिती उपायुक्त राजू खैरनार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. मनपा अधिकार्‍यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करत 50 लाखाचे सानुग्रह अनुदान मिळवून दिल्याबद्दल वारसदारांतर्फे मनपा अधिकार्‍यांचे आभार मानण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com