कांदा चाळीसाठी शासन मदत

आढावा बैठकीत कृषिमंत्र्यांचे आश्वासन
कांदा चाळीसाठी शासन मदत

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

कांदा पिकातील (Onion crop) मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत (Operation Green Plan) प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी कांदा पिकाचे तालुक्यातील क्षेत्र लक्षात घेता मोठ्या प्रमाणात कांदाचाळ उभारणी हाती घेतली पाहिजे यासाठी शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion growers), उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत कृषिमंत्री भुसे बोलत होते. कृउबा सभापती राजेंद्र जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, मनोहर बच्छाव, प्रमोद निकम, निळकंठ निकम, भावना निकम, संगमनेर येथील शेतकरी आशिष वाकचौरे यांच्यासह विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तालुक्यांतील पिक पध्दतीसमोर ठेवून त्यास शासकीय योजनांची सांगड घालावी. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर करावेत. कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ हा गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकर्‍यांना समोर ठेवून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकर्‍यांनी पुर्व तयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन कृषी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. भुसे यांनी पुढे बोलतांना केले.

डाळिंब पिक प्रस्ताव सादर करा

डाळिंब पिकाचे (Pomegranate crop) क्षेत्र मोठ्या प्रमाणात तालुक्यात असून मनरेगा (MGNREGA) अंतर्गत फळबाग लागवडीत राज्याने उच्चांक गाठला आहे. मात्र मनरेगातंर्गत फळपिक लागवडीत (Fruit cultivation) राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असतांना तालुक्यातून मिळणार अल्प प्रतिसाद आत्मचिंतन करणारा आहे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी कुटूंब मनरेगातंर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करुन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करावे.

गतवर्षीच्या तुलनेत रोपवाटीकांचा लक्षांक वाढवून देण्यात आल्यामुळे बळीराजाला यातून नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करतांना ना. भुसे म्हणाले, उद्यानविद्या क्लस्टर विकास कार्यक्रमातंर्गत (Cluster Development Program) डाळिंब पिकातील मुल्यसाखळी विकसीत करणेबाबत प्रस्ताव चार दिवसात राज्यशासनास सादर करावा

राजमाता जिजाऊ महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान (Rajmata Jijau Women Farmer Empowerment Campaign), पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) व पिक विमा योजनांबाबत (Crop insurance plans) तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचनाही कृषिमंत्र्यांनी शेवटी बोलतांना दिल्या.

Related Stories

No stories found.