Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ

Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ

निफाड | रावसाहेब उगले | Niphad

एकीकडे शासन (Government) गरीबांना रेशनच्या (Ration) माध्यमातून मोफत धान्य देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करीत असताना दुसरीकडे कर भरला नाही म्हणून रेशनचे धान्य न देण्याचा अजब ठराव निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) गोरठाण ग्रामपंचायतीने (Gorthan Gram Panchayat) केला आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे...

Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ
केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; नाशिक, अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

प्रेमविवाहासाठी आई - वडिलांची संमती असल्याचा पुरावा असल्याशिवाय विवाह नोंदणी न करण्याचा ठराव निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने (Saikheda Gram Panchayat) केला होता. त्यानंतर समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, आपण अशा प्रकारचा कायदा शासनाने करावा, असा ठराव केल्याचे घुमजाव ग्रामपंचायतीने केला होता. या प्रकारावर पडदा पडत नाही तोच गोरठाण ग्रामपंचायतीने कर (Tax) न भरणाऱ्या लाभार्थ्यांना रेशनचे धान्य न देण्याचा ठराव केला आहे.

Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ
Chandrayaan-3 Mission: जर चांद्रयान-३ उद्या उतरले नाही तर...; कशी असणार लँडिंगची प्रक्रिया

दरम्यान, याबाबत तलाठी घोटे यांंच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "असा ठराव कुठल्याही नियमात बसत नाही" असे सांगितले. कर वसुलीतून गावचा विकास करणे ठिक आहे. मात्र, कर भरला नाही म्हणून रेशनचे धान्य न देण्याचा केलेला ठराव करणारी गोरठाण ग्रामपंचायत बहुदा राज्यातील पहिलीच असावी.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ
शेतकऱ्यांच्या शेतमालावरच तुमचा डोळा का? - संदीप जगताप यांचा केंद्र सरकारला सवाल
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com