शाळा बंद ! तरीही लॉकडाऊनमध्ये आकाशची 'डिजिटल झेप'

गिरवतोय आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
शाळा बंद ! तरीही लॉकडाऊनमध्ये
आकाशची 'डिजिटल झेप'

सातपूर । Satpur

करोना काळात सर्व शाळा बंद असून विद्यार्थी आपल्या घरीच ऑनलाईन अभ्यास करत आहेत. यातून मिळणार्‍या फावल्या वेळात अभ्यासासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवत आहे.

आकाश ज्ञानेश्वर आंधळे या सहावीत शिकणार्‍या मुलाने न्यूज चॅनल मधील एडिटिंग करून आपली कला दाखवून दिली.

आकाश अण्णासाहेब वैशंपायन विद्यालय मध्ये इयत्ता 6 वीचा विद्यार्थी आहे. हवे तसे लोगो, पोस्टर बनवणे, बॅनर, लग्नपत्रिका तयार करणे हे कसब आकाश लिलया करतो.

विशेष म्हणजे तो बातम्यांचे संपादनसुद्धा करतो. अनेकांना हे सर्व शिकण्यासाठी एमएचसीआयटीचे ज्ञान असावे लागते. मात्र दृढ इच्छा शक्ती, शिकण्याची जिद्द, कला याच्या बळावर आकाशने हे सहज करुन दाखवले आहे. बहुतांश मुलांना मोबाईलचा उपयोग केवळ व्हिडिओ गेमसाठीच हाताळण्याची सवय आहे.

मात्र गेम खेळून वेळ वाया घालवण्यापेक्षा ज्ञानार्जन करुन स्वत:चा विकास साधणारे कमी असतात. त्या सर्वांना आकाशने आपल्या गुणवत्तेतून प्रोत्साहन दिले आहे. यासोबतच इतर अनेक विद्यार्थी आकाशचाआदर्श घेऊन विकास साधण्यासाठी पुढे येतील हे निश्चित.

Related Stories

No stories found.