वीकेंड लॉकडाऊनला नाशिककरांचा प्रतिसाद

वीकेंड लॉकडाऊनला नाशिककरांचा प्रतिसादनाशिक | Nashik
कोरोनाला रोखण्याकरिता (Corona Crisis) शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून वीकेंड लॉकडाऊनचा (Weekend Lockdown) पर्याय अवलंबिला जात आहे.

शासनाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यत बाजारपेठा (Market) खुल्या ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरात जेव्हापासून विकेंड लॉकडाउन घेतला जातोय, तेव्हापासून नाशिककर शासनाच्या नियमांचे पालन करत ( Corona Lockdown Rules) असल्याचे चित्र आहे.


शनिवारी (दि.3) सकाळपासूनच गर्दीचे ठिकाणे, बाजारपेठा निर्मनुष्य होत्या. शालिमार (Shalimar), सीबीएस(CBS) , मेन रोड, रविवार कारंजा, कॉलेज रोड, गंगापूर रोड् (Gangapur Road), महात्मानगर, त्र्यंबक रोड्, निमाणी बसस्थानक (Nimani Bus Stand) या गजबजलेल्या ठिकाणी रोजच मोठी गर्दी असते, मात्र विकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी मोजके वाहने सोडता शांतता होती.

नागरिकांना दोन दिवसांच्या लॉकडाउनची सवय झाल्याचे दिसून येत आहे. काही व्यावसायिकांनी शनिवार आणि रविवारी दुकाने उघडू देण्याची मागणी याआधी केली आहे, मात्र कोरोनाची स्थिती पाहता पुढील आणखी काही दिवस विकेंड्लॉकडाउन असाच सुरु राहण्याची शक्यता आहे.

हॉटेल व्यावसायिकांना (Hotel Proffession) या दोन्ही दिवशी पार्सल सुविधा (Parcel Service) सुरू ठेवण्याची अनुमती आहे. शनिवारी बहुतेक ठिकाणी रस्त्यावर शांतता होती. रिक्षा (Rikshaw) हॉटेल, कपडा दुकाने आदी सह सर्वच दुकाने बंद असल्याने एक शांतता होती. यातून नागरिक वीकेंड लॉक डाऊनला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहेे. विकेंड्लॉकडाउन वगळता हॉटेल चालकांसह इतर व्यावसायिकांना सामाजिक अंतर व इतर अटी शर्थी घालून देत आस्थापना सुरु करण्यास अनुमती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com