रोटरी क्लब
रोटरी क्लब
नाशिक

रोटरी सेंद्रिय बाजारला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद

नागरिकांकडून समाधान व्यक्त

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्यावतीने नाशिककरांसाठी आयोजित केलेल्या सेंद्रिय फळे, भाजीपाला आणि धान्य बाजारात नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्वच्छ, ताजा भाजीपाला माफक दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिककरांना शेतकऱ्यांचा सेद्रिय पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळे, विदेशी भाज्या कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध देण्यात आला होता. जैविक घटकांचा वापर करून हानिकारक रसायन विरहीत उत्पादित व प्रमाणित केलेल्या मालास ग्राहकांनी चांगली पसंती दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुवूनच प्रवेश दिला जात होता.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुवूनच प्रवेश दिला जात होता.

ग्रामीण भागातील शेतकरी महिला बचतगटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीचे आरोग्यवर्धक आलेपाक, पापड, कुरडई, शेवया, मसाले, सुकविलेल्या भाज्या, पंचगव्य उत्पादने, लाकडी घाण्याचे शेंग, खोबरे, बदाम, तीळ, मोहरी, करडई, सूर्यफुल खुरासणी, सूर्यफुल, एरंडतेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गुळ या उत्पादनांनादेखील चांगली मागणी होती. भाजीपला स्वच्छ, ताजा आणि माफक दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले मंथ लीडर सुरेखा राजपूत, सुधीर जोशी आदी प्रयत्नशील आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com