नाशिक । Nashik

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन', लायन्स क्लब ऑफ नाशिक कार्पोरेट व शासकीय जिल्हा रुग्णालय मेट्रो रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब हॉल येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले.

करोना महामारीच्या काळात मोठ्याप्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, भीतीपोटी रक्तदाते पुढे येत नाही, त्याच्यामुळे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काही गोष्टींवर झाला आहे. शासनाने सर्व शासकीय अस्थापना व सामाजिक संस्था यांना रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह पत्नी मयुरा मांढरे, मुलगी अस्मिता मांढरे यांनी रक्तदान केले

यावेळी रक्तदात्यास सन्मानपत्र व "मी रक्तदान केले याचा अभिमान आहे." असे विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रक्तदान शिबिरात संकलन केलेल्या रक्ताच्या पिशव्या जिल्हा शासकीय रुग्णालयकडे देण्यात आल्या.

रक्तदात्यास सन्मानपत्र व "व मी रक्तदान केले याचा अभिमान आहे." असे विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आले. शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नाशिक सायकलिस्टच्या सचिव डॉ. मनीषा रौंदळ,खजिनदार रवींद्र दुसाने , किशोर माने ,सुरेश डोंगरे संदीप गायकवाड ,संजय पवार, गणेश कळमकर, प्रशांत भागवत, गौरव शितोळे व लायन्स क्लब ऑफ नाशिक कारपोरेट चे अध्यक्ष श्री. रमेश पवार यांनी परिश्रम घेतले.