देव द्या, देवपण घ्या उपक्रमाला नाशिककरांचा प्रतिसाद

देव द्या, देवपण घ्या उपक्रमाला नाशिककरांचा प्रतिसाद
गणपती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) मूर्ती, त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे होणारे गोदावरी नदीचे (Godavari river) प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या (Vidyarthi Kruti Samiti) माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे distancing सर्व नियम पाळत देव द्या, देवपण घ्या (Dev Dya, Devpan Ghya) उपक्रम राबविण्यात येत आहे...

या उपक्रमाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार (Akash Pagar) यांनी दिली आहे.

गेल्या ११ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम नाशिकमध्ये राबविण्यात येत आहे. चोपडा लॉन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते मूर्ती स्वीकारत आहेत.

यंदाच्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने मोफत कुर्ता, फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझर देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com