पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेला गती

पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेला गती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दहावीच्या निकालानंतर (SSC Result) विद्यार्थांना ऑनलाईन गुणपत्रिका ,बैठक क्रमांक उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशाला (Polytechnic admissions) वेग आला आहे...

प्रवेश प्रक्रियेला दि. ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी (Online registration) करता येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला दहावीच्या निकालापूर्वीच सुरुवात झालेली असली तरी निकालानंतर ऑनलाईन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे.

पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली असली तरी पहिल्या १५ दिवसात ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड करण्याच्या प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला. काही विद्यार्थ्यांकडे त्यांचा बैठक क्रमांक नसल्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

तर काहींनी शाळांसोबत संपर्क साधून बैठक क्रमांक मिळवून नोंदणीप्रक्रिया पूर्ण केली. दहावीच्या निकालानंतर सुविधा केंद्रावरदेखील गर्दी वाढल्याचे दिसून येते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com