'सेव्ह पांजरपोळ' मोहिमेची व्याप्ती वाढली

'सेव्ह पांजरपोळ' मोहिमेची व्याप्ती वाढली

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

चुंचाळे (Chunchale) गावातील पांजरपोळ ट्रस्टच्या (Panjarpol Trust) एक हजार एकर जमिनीवरील दोन लाख झाडांवर सिडकोद्वारे (Cidco) नवीन शहर उभारणीसाठी कुऱ्हाड पडणार असल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमी नाशिककरांनी सेव्ह पांजरपोळ (Save Panjarpol) उपक्रमातून सोशल मीडियावर (Social media) नाराजी व्यक्त केली आहे...

सेव्ह पांजरपोळ मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे ऑक्सिजन (Oxygen) निर्माण करणारे जंगल वाचविण्यासाठी ऑनलाइन पिटीशन (Online petition) फाइल करण्यात आली आहे. या ऑनलाइन पिटीशनवर आतापर्यंत दोन हजार जणांनी हस्ताक्षर करीत मोहिमेला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येत आहे.

एक हजार एकरातील दोन लाखांहून अधिक झाडे असलेला चुंचाळेतील हा परिसर नाशिककरांचा 'ऑक्सिजन प्लान्ट' म्हणून ओळखला जातो. या जागेत दीड हजार गायींचे संगोपनदेखील केले जाते.

झाडे, वन्यप्राणी अशा जैवविविधतेने हा परिसर बहरलेला आहे. या जागेवर सिडकोचे नवशहर वसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ही जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत पर्यावरण आणि निसर्गप्रेमींनी सिडकोच्या या प्रकल्पाबाबत आक्षेप नोंदविण्यास सुरुवात केली आहे. जंगल बळकावण्याचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी 'सेव्ह पांजरपोळ' मोहिमेला ऑनलाइन पिटीशनच्या माध्यमातून बळ देण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत दोन हजार नाशिककरांनी सिडकोच्या या प्रयत्नावर आक्षेप नोंदविण्याचे आवाहनदेखील नाशिककरांना करण्यात आले आहे.

वन्यजीव, झाडांचे असंख्य प्रकार येथे पाहायला मिळतात. हे नष्ट झाले तर असमतोल निर्माण होईल. हे जंगल शहरात असल्याने आल्हाददायीपणाला ते हातभार लावत आहे, हे विसरून चालणार नाही. पांजरपोळचे जंगल वाचायलाच हवे.

जुई पेठे, जैवविविधतेच्या अभ्यासक चुंचाळेतील वृक्षसंपदा वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असेही आवाहनही सोशल मीडियावर केले जात आहे. नाशिकच्या विकासाबरोबरच निसर्गाच्या वृद्धीसाठीही पुढील २५ वर्षांसाठी नियोजन करावे, असेही अनेकांनी सूचविले आहे.

पर्यावरणमंत्र्यांना साकडे

'आम्ही सर्वजण शाश्वत विकासाच्या बाजूने आहोत. जेव्हा पर्यावरण वाचवण्याचा पर्याय असेल आणि विशेषतः असा शहरातला झाडांनी भरलेला परिसर जिथे बिबटे आणि इतर प्राणी मुक्तपणे संचार करतात, सरकारने त्याचे रक्षण करायला हवे.

दुसरे पर्याय नाहीत असे नाही, पण हा हट्टीपणा झाला, असे शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष व पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी आरे' वाचविण्यासाठी पाठिंबा देताना म्हटले होते. हेच नाशिकलाही लागू होत असल्याने चुंचाळेतील जंगल वाचविण्यासाठी त्यांनीच प्रयत्न करावे, अशी मागणी नाशिककर सोशल मीडियावर करू लागले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com