सातपूर विभागात लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातपूर विभागात लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातपूर | Satpur

सातपूर विभागात व्हॅक्सिनेशन साठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून एकट्या ईएसआयसी रूग्णालयाने नुकताच दहा हजाराचा टप्पा गाठला आहे.

आयमा ने सुरू केलेल्या दोन व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये मागील तीनच दिवसात दोन हजार नागरिकांनी लस टोचून घेतली आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यात आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासनाद्वारे सुरक्षिततेचे उपाय म्हणून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लस टोचली जात आहेत. या लसीचे दोन डोज घेतल्यानंतर आजाराचा प्रादुर्भाव होण्याची संभावना कमी असल्याने नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत.

एस आय रुग्णालयामध्ये काल दहा हजाराचा टप्पा पूर्ण झाला असून, दहा हजाराव्या नागरीकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कालच्या संपूर्ण दिवसात आणखी तीनशे ते चारशे लसीकरण करून घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र होते.

आयमाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सातपूर व अंबड येथील दोन लसीकरण केंद्रात आतापर्यंत दोन हजार कामगार व उद्योजकांनी लस टोचून घेतली आहे. यासोबतच सातपूर गावातील मायको हॉस्पिटल व सातपूर कॉलनी येथील मनपा हॉस्पिटलमध्ये लसीकरणाचे काम सुरू आहे.

नागरिकांमध्ये जागरूकता

सातपूर विभागात लसीकरण साठी नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. दिवसाला चारशे ते सव्वा चारशे लसीकरण करून ही एस आय ने सर्वोच्च क्रमांक गाठला आहे कालच दहा हजाराचा टप्पा हि पार केला आहे

- डॉ राजश्री पाटील, वैद्यकीय अधीक्षक ई एस आय रुग्णालय

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com