वीकेंड लॉकडाऊनला जुने नाशिककरांचा उत्फुर्स प्रतिसाद

वीकेंड लॉकडाऊनला जुने नाशिककरांचा उत्फुर्स प्रतिसाद

जुने नाशिक | Nashik

शासनाच्या विकेंड लॉक डाऊनला जुने नाशिककारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या ब्रेक दि चैन मोहिमेला सुरू होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ गेला आहे.

या संपूर्ण काळात जुने नाशिककरांनी आपल्या संयमाचे दर्शन घडविल्या ने समाधान व्यक्त होत आहे. येथील प्रमुख बाजारपेठे देखील मागील अनेक दिवसांपासून बंद पडली आहेत.

सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव ईदची देखील तयारी करीत आहे. अशावेळी बाजारपेठेत मोठी रोनक असते मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी देखील बाजारात शुकशुकाट आहे. मात्र मुस्लीम बांधव घरी नियमितपणे व अधिक प्रमाणात प्रार्थना करीत आहे. करोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. तर यांना नागरिकांच्या देखील मोठा पाठिंबा आता मिळताना दिसत आहे.

जुने नाशिकच्या चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, नानावली, अमरधाम रोड, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवार पेठ, द्वारका, काठे गल्ली, टाकळी रोड, वडाळा नाका, मोठा राजवाडा, सारडा सर्कल, मौलाना आझाद रोड, मदिना चौक, दारुसलाम कॉलनी, मोहम्मद अली रोड, काजी नगर, आएशा मस्जिद परिसर, शहीद अश्फाक् उल्लाह खान चौक, वडाळागाव, विनय नगर, डीजीपीनगर आदी भागातील सर्व प्रकारची दुकाने बंद राहत आहे तर मेडिकल दिवसभर सुरू असतात. त्याचप्रमाणे दूध विक्री करणारे सकाळी काही वेळ व सायंकाळी काही वेळ दुध विक्री करताना दिसत आहे.

या शिवाय कोणत्याही प्रकारचे व्यवहार होताना दिसत नाही. पोलिस सतत गस्त घालत आहे तर रिकामे बसणाऱ्या टोळक्यांना देखील ते सूचना देत आहे. यामुळे करोनाची साखळी तोडण्यास मदत होईल व लवकरात लवकर हे हद्दपार होईल असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय धमाळ तसेच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे रात्री उशिरापर्यंत परिसरात गस्त घालताना दिसत आहे. त्याचप्रमाणे बीट मार्शल देखील विविध ठिकाणी जाऊन कायदा भंग करणाऱ्यांना सूचना करीत आहेत. यंदा तरुणांनी देखील संयमाचे दर्शन दिल्याचे दिसून येत आहे.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे भाविक घरीच पाच वेळेची नमाज तसेच रमजानची विशेष नमाज देखील पठण करीत आहे. मशिदींमध्ये फक्त निवडक लोकच नमाज पठण करीत असल्यामुळे बाहेर गर्दी होत नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com