जि. प. नाशिक
जि. प. नाशिक
नाशिक

जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 'गुडन्यूज'

पतसंस्थेची कर्ज वाटप मर्यादा पाच लाख रुपयांवर

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या पतसंस्थेची सभासद कर्ज मर्यादा चार लक्ष होती.

पतसंस्थेच्या सभासद यांनी केलेल्या मागणीनुसार दि. १५ ऑगस्ट, २०२० पासुन सभासदांच्या कर्ज मर्यादेत वाढ करुन ही कर्ज मर्यादा चार लक्ष वरुन पाच लक्ष करण्याच्या विषयास नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने मासिक सभेत एकमुखाने मान्यता दिली.

संस्थेचे अध्यक्ष विजय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे सभासद असलेल्या आरोग्य सेवकांसाठी कुटुंब संरक्षण विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

त्यानुसार, आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे सभासद असलेल्या व विहित अटी व शर्थी पूर्ण करणाऱ्या माहे ३१ मार्च, २०२० अगोदर निधन झालेल्या सभासद वारसास एक लक्ष विमा मदत तर १ एप्रिल, २०२० नंतर मयत झालेल्या सभासद वारसास रुपये दोन लक्ष विमा मदत पतसंस्थेतर्फे दिली जात आहे.

सिन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ठाणगांव येथे कार्यरत असतांना मयत झालेले आरोग्य सेवक स्व. पुंजाराम लोहकने यांच्या वारसास एक लक्ष तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबोली येथे कार्यरत असतांना मयत झालेले आरोग्य सहाय्यक दिवंगत सुनील पगारे यांच्या वारसास दोन लक्ष विमा मदत मासिक सभेत मंजुर करण्यात आली.

या मदतीचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय देवरे यांनी दिली.

What is employee well being नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील सभासद असलेल्या आरोग्य कर्मचारी यांचेसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात फोनपे स्टिकर लावण्यात आले आहे.

फोन पे सुविधेद्वारे पतसंस्थेचा कर्ज हप्ता तथा सभासद वर्गणी पतसंस्थेच्या बँक खात्यावर सहज भरता येणार आहे.

यामुळे कर्जदार सभासदास फोन पे सुविधेद्वारे तात्काळ आपल्या कर्तव्य मुख्यालयी राहून सुद्धा आपल्या मोबाईलद्वारे कर्ज हप्ता भरणे सुलभ होणार आहे. पतसंस्थेच्या सभासदास कर्ज मागणी केल्यास, तात्काळ कर्ज उपलब्ध होत आहे.

आरोग्य कर्मचारी पतसंस्थेने थोड्याच अवधित कर्ज मर्यादा रुपये चार लक्ष वरुन पाच लक्ष मर्यादेपर्यंत नेली, त्याबद्दल नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळ व सभासद यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सभासद मासिक वर्गणी व कर्ज वसुली बाबत वेळेत पतसंस्थेस भरना करण्याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे पतसंस्था कर्ज मर्यादेत वाढ करु शकत असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा आरोग्य कर्मचारी पतसंस्था मर्यादित नाशिकचे संस्थापक अध्यक्ष जी.पी. खैरनार यांनी केले आहे.

नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेची मासिक सभा संस्थेचे अध्यक्ष विजय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सभेस उपाध्यक्ष जयवंत सोनवणे, सचिव श्रीमती सोनाली तुसे, संस्थापक चेअरमन तथा संचालक जी.पी.खैरनार, संचालक सर्वश्री एफ. टी.खान, मधुकर आढाव, विजय सोपे, प्रशांत रोकडे, संजय पगार, श्रीकांत अहीरे, गोरक्षनाथ लोहकरे, सुनिल जगताप, तुषार पगारे, जयवंत सूर्यवंशी, श्रीमती सुलोचना भामरे व व्यवस्थापक रामदास वडनेरे उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com