चांगल्या सवयी आयुष्यात नेहमीच महत्त्वाच्या

चांगल्या सवयी आयुष्यात नेहमीच महत्त्वाच्या

नाशिक | Nashik

जीवनात येणाऱ्या अनंत अडचणी आणि नानाविध प्रसंग हे आपल्या छोट्या-छोट्या सवयींवरच अवलंबून असतात. अशा अडचणी किंवा मनावर विपरीत परिणाम करणारे प्रसंग आयुष्यात येऊच नये, असे वाटत असेल तर आपल्याला आपल्या काही सवयींमध्ये बदल करावा लागेल. चांगल्या सवयी अंगी बाळगाव्या लागतील. असे प्रतिपादन कवी रविंद्र मालुंजकर (Ravindra Malunjkar) यांनी केले...

विल्होळी (Vilholi) येथील ॲम्रो ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सचे प्राचार्य गिरीश पाटील यांनी लिहिलेल्या ‘सवयींवर बोलू काही’ आणि ‘सु-विचारपूष्प’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन सूरज एज्युकेशनल सोसायटी या संस्थेच्या संचालिका सुनंदा सोनी व मालुंजकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. प्रा. रोहन सोनी, अक्षरबंध प्रकाशनचे संचालक प्रवीण जोंधळे, कथालेखक सप्तर्षी माळी, जितेंद्र येवले आदी व्यासपीठावर होते.

मालुंजकर पुढे म्हणाले की, माणसाच्या बोलण्या-वागण्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची छाप समाज मनावर पडत असते. अशा प्रसंगी नेहमीच उद्‌बोधन करणारी छोटी-छोटी वाक्ये, सुविचार, चारोळ्या, मान्यवरांचे प्रसंगोचित कोट्‌स आदींचा वापर बोलण्यातून केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

प्रा.गिरीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार भाग्यश्री बेले हिने मानले. पुंजाजी मालुंजकर, संजय जाधव, प्रेम पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवंश देसाई, अभिषेक रसाळ, योगेश जोशी, गौरव दीक्षित, शिवदास काळे यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com