'या'मुळे शिर्डी रस्त्यावरील व्यावसायिकांना अच्छे दिन

'या'मुळे शिर्डी रस्त्यावरील व्यावसायिकांना अच्छे दिन

निफाड। प्रतिनिधी Niphad

करोना (corona) प्रादूर्भावामुळे तब्बल दीड वर्ष बंद असलेली साईभक्तांची शिर्डी (shirdi) पदयात्रा (padyatra) आता करोना प्रादूर्भाव कमी झाल्याने पुन्हा सुरू झाल्याने दिपावलीनंतर (diwali) सुरत-शिर्डी मार्ग (Surat-Shirdi route) साईभक्तांनी (Sai devotees) गजबजून गेला आहे.

तालुक्यातील मंगल कार्यालये, मंदिरे, धर्मशाळा (dharmashala) साईभक्तांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या असून सकाळ-सायंकाळ या मार्गावर साईभक्त पायी प्रवास करतांना दिसत आहे. साहजिकच या रस्त्याच्या कडेला असणार्‍या व्यवसायिकांना देखील ‘अच्छे दिन’ (acche din) आले आहेत. दिपावलीनंतर दररोज गुजरात (gujrat) राज्यातील हजारो भाविक शिर्डी येथे साईबाबा (saibaba) चरणी नतमस्तक होण्यासाठी पायी प्रवास करतात.

साहजिकच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, शेतकरी, व्यवसायिक या साईभक्तांसाठी राहण्याची, भोजनाची व नाष्ट्याची मोफत व्यवस्था करतात. तालुक्यात पिंपळगाव (pimpalgaon), दावचवाडी (davachwadi), निफाड (niphad), शिवरे फाटा, विंचुर (vinchur), भरवसफाटा, कोळगाव, खेडलेझुंगे आदी परिसरात साईभक्त मुक्कामी थांबून भल्या सकाळी पायी प्रवासाला निघतात.

यात अनेक भाविक साईंच्या पादुका, मुर्ती पालखीद्वारे शिर्डी येथे घेऊन जातात. तर अनेक भाविक मोटारसायकल, चारचाकी वाहनाने साई दर्शनासाठी येतात. सध्या दिपावली संपल्याने वणी ते शिर्डी मार्गावर मोठ्या प्रमाणात गुजरातचे हे साईभक्त पायी प्रवास करतांना दिसत आहेत. तर या भक्तांसमवेत साईबाबांच्या मोठमोठ्या मुर्त्या समवेत डी.जे. असा लवाजमा असून मजल-दरमजल करीत हे भाविक शिर्डी येथे पोहचतात.

साहजिकच या रस्त्याच्या कडेला असणारी हॉटेल (hotels), पानटपरी, किराणा दुकाने, ढाबे (dhaba) आदींचा व्यवसाय देखील बहरला असून साईभक्तांमुळे या व्यवसायिकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मागील दीड वर्ष करोनामुळे सर्व व्यवसाय बंद होते. तसेच प्रवास करण्याला बंदी होती. परिणामी मागील वर्षी साईभक्तांना पदयात्रा करता आली नाही.

आता करोना प्रादूर्भाव कमी झाल्याने गुजरात मधील नवसारी (navsari), वघई (vaghai), सुरत (surat), अहमदाबाद (Ahmedabad), वाझदा (Wazda), बिल्लीमोरा आदी शहरातून व परिसरातून भाविक मोठ्या संख्येने शिर्डीच्या दिशेने पायी प्रवास करतांना दिसत असून यात लहानांपासून ते अबाल वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. डी.जे. च्या तालावर थिरकत तर कुठे सिनेमाची गाणी वाजवत तसेच भक्तीगीते गात हे भाविक शिर्डीच्या दिशेने कूच करतांना दिसत असून

हिवाळ्यात उन्हाची तिव्रता नसल्याने तसेच थंडीही पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने पायी प्रवासासाठी अनुकूल वातावरण असल्याने दिवसभर पायी प्रवास करायचा व जेथे रात्र होईल तेथे मुक्काम करायचा असा दिनक्रम या साईभक्तांचा असून गेल्या दोन दिवसांपासून साईभक्तांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा मार्ग गजबजून गेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com