
नाशिक । प्रतिनिधी । Nashik
मोटरसायकलवर आलेल्या तीन भामट्यांनी इंदिरानगर परिसरातील (Indiranagar area) एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची पोत लंपास करत घटनास्थळावरून पोबारा केला आहे..
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजया अशोक महाजन (Vijaya Ashok Mahajan) ( ६४,रा. महालक्ष्मी दर्शन रो हाऊस नंबर १,अभिनंदन लॉन्सच्या मागे, वासन नगर, पाथर्डी फाटा) या त्यांच्या रो हाऊस जवळून जात असताना दुचाकीवर (Two - wheeler) आलेल्या तीन अनोळखी भामट्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओढून घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक उघडे (Sub-inspector ughade) करत आहेत.