सोनसाखळी चोरास 'सिनेस्टाईल' अटक

सोनसाखळी चोरास 'सिनेस्टाईल' अटक

नाशिक रोड । प्रतिनिधी Nashikroad

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडणारा chain Snatcher तसेच उघड्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला नाशिक रोड पोलिसांनी Nashikroad Police शिताफीने अटक केली असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी जेलरोड येथील ढिकले नगर परिसरात एक महिला शतपावली करत असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र एका दुचाकी चालकाने ओरबाडून नेले होते दरम्यान या घटनेनंतर सदर महिलेने नाशिक रोड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती

.संशयित चोर हा सामनगाव रोड Samangaon Road परिसरात पॉलिटेक्निक कॉलेज जवळ फिरत असल्याची माहिती हवालदार विशाल पाटील यांना समजली त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह साध्या वेशात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याचे नाव लहू बबलू काळे 30 राहणार पळसे साखर कारखाना मेन गेट समोर असे असल्याचे आढळले तसेच आणखी सखोल चौकशी केल्यानंतर त्याने संबंधित महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली त्याच प्रमाणे नाशिक रोड पोलीस भगवा चौक पवन रेसिडेन्सी या भागात उघडे असलेल्या घरात प्रवेश करून घरातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व एक सोन्याची नथ असा ऐवज चोरून नेला होता असे त्याने पोलीस तपासात सांगितले.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे राजू पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक योगेश पाटील जयेश गांगुर्डे हवालदार अनिल शिंदे अविनाश देवरे विशाल पाटील विष्णू गोसावी बबलू घनदाट राकेश बोडके कुंदन राठोड सोमनाथ जाधव केतन कोकाटे आदींनी पार पाडली.

Related Stories

No stories found.