घरफोडीतून विक्री केलेला सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी
घरफोडीतून विक्री केलेला सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या (Crime Branch Unit Number Two)पथकाने गेल्या काही दिवसांपूर्वी सापळा रचून दोन संशयितांना अटक केली होती त्यांच्याकडून त्यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या या दोन्ही संशयतांनी अजून दोन घरफोडीची( burglaries ) कबुली देत त्यांनी विक्री केलेल्या सोन्याचा तब्बल 18 लाखाचा मुद्देमाल सोनाराकडून जप्त करण्यात पोलिसांनी यश मिळवले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने रोहन संजय भोळे (३५,रा. जयप्रकाश सोसायटी, रूम नंबर 12, विद्यानगरी, नाशिक रोड), ऋषिकेश मधुकर काळे (२६, रा. गंधर्व नगरी, पद्मिनी सोसायटी, फ्लॅट नंबर ३, नाशिक रोड) यांना सापळा रचून अटक करून त्यांच्याकडून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी केलेल्या घरपोडीतील तब्बल 32 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

दरम्यान सदर संशयतांनी पोलीस कोठडीत असताना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जय भवानी रोड येथे एका बंगल्यावर दिवसभर पाळत ठेवून रात्री त्या बंगल्यावर घरफोडी केल्याचे कबूल केले. यावेळी पोलिसांनी रोहन भोळे याच्याकडे चोरीला गेलेल्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर दागिने त्याचा जेल रोड येथील ओळखीचा सोनार तुषार रामचंद्र शहाणे (रा. नारायण बापू नगर जेलरोड ) याला विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले.

तसेच पोलिसांनी शहाणे याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर दागिने सराफ बाजारातील श्री लक्ष्मी केदार ज्वेलर्स येथे विक्री केल्याचे सांगितले त्यावेळी पोलिसांनी श्री लक्ष्मी केदार ज्वेलर्स चे मालक राजेंद्र ज्योतिबा घाडगे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी तुषार शहाणे यास ओळखत असून त्याचे जेलरोड येथे सोन्याचे दुकान असल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून तो सोने चांदी खरेदी विक्री करण्यासाठी येत असतो असे सांगितले.

सदर सोने चोरीचे असल्याचे त्यांना पोलिसांनी कळवल्याने त्यांनी ते वितळून लगड केले असल्याचे पोलिसांना सांगत 385.310 ग्रॅम वजनाची 16 लाख 15 हजार 547 रुपयांची सोन्याची लगड व चार किलो ग्रॅम वजनाची एक लाख 70 हजार 757 रुपयांची चांदी असा एकूण 17 लाख 86 हजार 304 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.

याप्रकरणी पोलिसांनी सोनार तुषार शहाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. हि कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे संजय बारकुंड,सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनी आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, राजेंद्र जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक बेडकोळी,हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे, देवकिसन गायकर, सुगन साबरे, अनिल लोंढे, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, प्रकाश बोडके, राजेंद्र घुमरे, संपत सानप, संजय सानप, संदीप रामराजे, सोमनाथ शार्दुल, सुनिल आहेर, विवेक पाठक, राजाराम वाघ, बाळु शेळके, परमेश्वर दराडे, प्रशांत वालझाडे, चंद्रकात गवळी, विजय वरंदळ, यादव डंबाळे, राहुल पालखेडे, मधुकर साबळे, संतोष ठाकुर, अतुल पाटील यांनी केली.

या गुन्ह्यातील संशयितास शेयर मार्केट( Stock Market ) मध्ये तब्बल ३४ लाख ९२ हजार रुपये नुकसान झाले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com