नवरात्रोत्सवासाठी देवी मंदिर सजले

भाविकांमध्ये उत्साह; पुजासाहित्य खरेदीसाठी गर्दी
नवरात्रोत्सवासाठी देवी मंदिर सजले

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

आदिशक्ती भगवतीच्या उपासना पर्व असणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवास (Navaratrotsav) घटस्थापनेने (Ghatsthapna) प्रारंभ होणार आहे. करोना (corona) प्रादुर्भावामुळे गत दिड वर्षापासून बंद असलेली मंदिरे गुरूवारपासून सुरू होत असल्याने शहर-परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील विविध देवी मंदिरेही रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने (Electric lighting) सुशोभित करण्यात आली आहेत. शहरातील पुरातन श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानाच्या (Shri Venkatesh Balaji Devasthan) ब्रम्हकल्पोत्सवासही आजपासून प्रारंभ होत असल्याने श्री गोविंदा भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. करोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यास्तव शासनातर्फे धार्मिक स्थळे (Religious places) बंद करण्यात आली आहे.

बाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून यावर्षी देखील नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर शासनाची बंदी असल्याने गरबा, दांडिया (Dandiya), मिरवणुकांना बंदी (Prohibition of processions) आहे. नवरात्रोत्सव तसेच श्री बालाजी महोत्सवाचे (Shri Balaji Mahotsava) कार्यक्रम घेतांना देखील करोनाचे नियम पाळणे शासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. देवी दर्शनासाठी मंदिरांमध्ये जाता येणार असले तरी मंदिरांमध्ये सुरक्षित अंतराचे नियम पाळणे भाविकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

दांडिया, गरबा (Garba) आदी कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे तरूणाईचा हिरमोड झाला असला तरी मंदिरात जावून आदिशक्तीचे दर्शन घेता येणार असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. भगवती आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी घटस्थापना करण्याची जय्यत तयारी भाविकांतर्फे केली जात असून मंदिरांमध्येही घटस्थापना होणार असल्याने नवरात्रोत्सवाच्या पुर्वसंध्येला आज शहरातील सरदार चौक, मोसमपुल, सटाणानाका, कॅम्प सोमवार बाजार आदी भागात

घटस्थापनेसाठी आवश्यक पुजा साहित्य तसेच भगवतीच्या वेगवेगळ्या रूपातील मुर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. घटस्थापनेसाठी आवश्यक बोळकी, श्रीफळ, बदाम, खारीक, हळदीचे खांड, कापूर, टोपली, विड्याची पाने, मद्य्राचे कापड, घट उभारण्यासाठी आवश्यक काळी माती आदी पुजासाहित्य 100 ते125 रूपयांपर्यंत तर अखंड ज्योत प्रज्वलीत ठेवण्यासाठी आवश्यक दगडी दिवा 100 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत विक्री केला जात होता.

याशिवाय चक्रपुजेचे साहित्यही भाविकांतर्फे खरेदी केले जात होते. 150 ते 4 हजार 500 रूपयांपर्यंत लहान ते मोठ्या भगवतीच्या विविध रूपातील मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. पुजा साहित्याची 10 ते 15 टक्के झालेली दरवाढ तसेच भाविकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळण्याची शंका असल्यामुळे यंदा साहित्याची ठराविक स्वरूपातच खरेदी केली असल्याचे दुकानदारांनी सांगितले. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील भगवतीच्या मंदिर परिसरात स्वच्छतेसह रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाले आहेत.

घटस्थापना व आदिशक्तीच्या महापुजेव्दारे नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार असून शहरातील सांडव्याची सप्तश्रृंगी देवी, कोठ्यातील महालक्ष्मी, मातामठची आदिशक्ती, कॅम्प अंबिका देवी (Amika Devi), कालिका माता (Kalika Mata), भद्रकाली (Bhadrakali) व हिंगलाज माता (Hinglaj Mata) मंदिर, अयोध्या नगरातील तुळजा भवानी (Tuljabhavani), जुन्या आग्रारोडवरील सप्तश्रृंगी देवी (Saptashrungi Devi) मंदिरात नवरात्रोत्सवात घटस्थापनेसह महापूजा (Mahapuja), यज्ञ, देवीचा जागर आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. मंडळांतर्फे भव्य मंडप व शामियाने उभारण्यात आले असून आज सवाद्य मिरवणुकीने आदिशक्ती मुर्तीची मंडळांमध्ये प्रतिष्ठापना केली जाईल.

Related Stories

No stories found.