गोदावरी तीर्थ अयोध्येला रवाना
नाशिक

गोदावरी तीर्थ अयोध्येला रवाना

कुशावर्तवर गंगापूजन

Abhay Puntambekar

त्र्यंबकेश्वर । वार्ताहर Trimbakeshvar

आज दि ३० जुलै रोजी 'गोदावरी तीर्थ' अयोध्येतील राम मंदिरासाठी पाठविण्यात आले . त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पुरोहित संघाकडून गंगापूजन करण्यात आले.

प्रभू राम मंदिरासाठी थेट ब्रम्हगिरी पर्वतावरील गोदावरी उगम येथील तीर्थ तसेच कुशावर्तातील गोदावरी तीर्थ व त्र्यंबकेश्वर मंदिरातील तीर्थ असे कलशात भरून विधिवत पुजन करण्यात आले अशी माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी दिली. ज्यांनी कार सेवेत भाग घेतला त्यांचे हस्ते ही पूजन झाले.

श्री श्री १००८ श्रीनाथ पिठाधिश्वर पुज्यपाद जितेंद्रनाथ महाराज अमरावती, पुरोहित संघ यांचे कडे तीर्थ पोहचविण्यात येणार आहे अशी माहिती लोकेश शास्त्री अकोलकर यांनी दिली दि ४ ऑगस्ट रोजी हे तीर्थ अयोध्येत पोहचेल.

पुरोहित संघ पदाधिकरी प्रशांत गायधनी,मनोज थेटे, श्रीपाद आकोलकर. मोहन लोहगावकर ललित लोहगावकर, मनोज ढरगे, उदय थेटे विश्व हिंदू परिषदेचे दिलीप लोहगावकर, सुनील देवकुटे, संजय लोहगावकर, उमेश कुमार तानपाठक, त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम मंदिराचे अध्यक्ष- बाळासाहेब कळमकर कौस्तुभ शास्त्री पाटणकर,गिरीश जोशी कारसेवक - चंद्रकांत प्रभूने प्रभूणे, सुनील लोहगावकर, विशेषतः महिला कारसेवक - देवयानी निखाडे व गुलाबताई शेटे यांनी प्रत्यक्ष कार सेवेत भाग घेतलेला होता .

Deshdoot
www.deshdoot.com