गोदावरीमुळे नाशिकची ओळख; नाशिकमुळे गोदावरीची नाही

प्रा.डॉ.शिल्पा डहाके
गोदावरीमुळे नाशिकची ओळख; नाशिकमुळे गोदावरीची नाही

नाशिक | Nashik

नाशिकचे वातावरण (Nashik Climate) दिवसेंदिवस उष्ण होत असताना नाशिकचा पारा (Nashik Mercury) कधी नव्हे तो ४० अंश सेल्सिअसच्या पुढे सरकताना दिसत आहे. याचे मुख्य कारण झपाट्याने वाढणारे शहरीकरण असून त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. नाशिकची ओळख गोदावरी नदीमुळे निर्माण झाली असून नाशिकमुळे गोदावरीची ओळख नाही हे नाशिककरांनी सतत लक्षात ठेवावे असे प्रतिपादन प्रा.डॉ.शिल्पा डहाके (Prof Shilpa Dahake) यांनी केले....

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने प्रा.डॉ.शिल्पा डहाके (Dr Shilpa Dahake) यांचे गोदावरी नदी (Godavari River) विषयीचे व्याख्यान राष्ट्रवादी भवन (NCP Bhawan) येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

व्याख्यानाकरिता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिवस सायकलीचा वापर करून पर्यावरण विषयक जनजागृती केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन अर्बन सेलचे राहुल खालकर (Rahul Khalkar) व डॉ.मृगाक्षी क्षीरसागर (Dr Mrugakshi Kshirsagar) यांनी केले होते.

यावेळी प्रा डॉ. डहाके (Prof Dr Shilpa Dahake) म्हणाल्या की, गोदावरी, पाऊस व जीवन हे समीकरण बिघडल्याने वातावरणात बदल घडताना दिसत आहे. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूची साखळी बदलाचा परिणाम गोदावरी नदीवर होतो आहे.

झपाट्याने वाढणारे शहरीकरण हे बदलता येणार नाही परंतु नागरिकांनी आपले राहणीमान पारंपारिक पद्धतीने करावे. नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी तातडीने थांबवून त्यावर प्रक्रिया करून ते सांडपाण्याचा पुर्नवापर करावा. पावसाच पाणी जमिनीत मुरल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.

सद्यस्थितीत गोदावरी ही कोरडी असून सांडपाण्यामुळे किंवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे ती प्रवाही दिसते. सांडपाण्यात प्रत्येक घरातून निघणारे रसायन असल्याने नदीचे पाणी आणखी दुषित होते.

सकाळी दात घासणारे टूथपेस्ट, केस धुण्यास वापरणारा शेम्पू अशा छोटछोट्या गोष्टीत रसायानाचा वापर होते व हे रसायन सांडपाण्याद्वारे नदीत मिसळत असते. याकरिता दात घासण्यासाठी निंबाची काडी तर केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर करावा. सांडपाण्यामुळे कधीनव्हे ते पानवेळीची समस्या समोर आली असल्याचे प्रा.डॉ.शिल्पा डहाके यांनी आपल्या व्याख्यान सांगितले.

नाशिक हा धरणाचा जिल्हा (nashik dams district) असून नाशिकला पाण्याची कमतरता नाही परंतु गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. (Water scarcity) वॉटर, गटर व मीटर यासोबत पर्यावरण विषयी काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अनिता भामरे, अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, डॉ.मृगाक्षी क्षीरसागर, राहुल खालकर, डॉ.अमोल वाजे, सुषमा पगारे, सुरेखा निमसे, जगदीश पवार, किशोर शिरसाठ, मनोहर कोरडे, जीवन रायते, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, समाधान तिवडे, सुनिल अहिरे, नदीम शेख, गौतम पगारे, नईम शेख, योगिता आहेर, आसिफ जानोरीकर, नाना पवार, जय कोतवाल, बाळा निगळ, राहुल तुपे, रामदास मेदगे, डॉ. संदीप चव्हाण, रवि शिंदे, मंगेश लांडगे, बाळासाहेब जाधव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com