नाशिक । Nashik

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी त्यात निळ्या पूररेषेत कामे केली जाणार असून अनावश्यक अशा कामासाठी कोट्यवधीची उधळपट्टी केली जाणार असल्याचा सूर गोदाप्रेमींमध्ये उमटत आहे.

विशेष म्हणजे स्मार्ट सिटिकडून केल्या जात असलेल्या कामांबाबत गोदाप्रेमींना अज्ञभिन्न ठेवले जात आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गोदावरिच्या मुळ स्वरुपाला धक्का लागता कामं नये ही गोदाप्रेमींची अपेक्षा आहे.

२००२ सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरी पात्र व घाटाचे काॅक्रिटिकरण करण्यात आले. त्यामुळे गोदापात्रातील प्राचीन कुंड बुजविले गेले. गोदाप्रेमींनी त्याविरुध्द लढा दिल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर गोदापात्र तळाचे काॅक्रिटिकरण काढून जलस्त्रोत पुनर्जिवित करण्यात आली. दुसरिकडे मात्र, स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा सुशोभिकरणासाठी कोट्यवधीची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यात सोमेश्वर पासून ते होळकर पुलापर्यंत गोदापार्क,

अॅम्पीथिएटर, हेरिटेज वाॅक, सायकल मार्ग, उपहार गृह, दगडी बाकडे, वाॅक वे, बबल जेट फाउंडन, बोर्डेक्स मिरर इफेक्ट, रामायण सर्किट गार्डन उभारले जाणार आहे. ही कामे करताना गोदेच्या निळ्या पूर रेषेत अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गोदाप्रेमींचा त्यास आक्षेप असून गोदेचे भूमिगत जलस्त्रोताना धोका निर्माण होऊन नदीच्या अस्तित्वावरच घाव घालू नका, अशी गोदाप्रेमींची मागणी आहे.

गाळ काढण्याचे काम सुरु

होळकर पुलाखाली स्वयंचलित दरवाजे बसविले जाणार आहे. त्यासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. पण गाळ काढण्याऐवजी ठेकेदार वाळू उपसा करत असल्याची तक्रार गोदाप्रेमींनी केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा सुशोभिकरणाचे काम सुरु असले तरी नेमके कोणती कामे केली जाणार आहे याबाबत गोदा संवर्धनासाठी लढणारे व गोदा प्रेमींना अंधारात ठेवले आहे. नदीच्या निळ्या पूररेषेत कोणतेही काम केले जाऊ शकत नाही. वरील कामे शाश्वत असावी. पुर आल्यावर ही कामे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोदावरीच्या प्रवाहाला बाधा निर्माण होईल अशी कोणतिही कामे केली जाऊ नये.

- प्राजक्ता बस्ते, प्राचार्य आर्किटेक्चर काॅलेज, मविप्र