गोदावरी उत्सवाला वारसा फेरीने सुरुवात

गोदावरी उत्सवाला वारसा फेरीने सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वातंंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नासिक Collector Nashik , राज्य पुरातत्त्व विभाग State Archaeological Department व नाशिक इतिहास संशोधन मंडळ Nashik History Research Board यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी उत्सवाची Godavari Festival सुरुवात झाली. येत्या 21डिसेबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

सकाळी गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या माध्यमातून प्रारंभ झाला. पूजा नीलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदी संदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले होते. याला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, पर्यटन उपसंचालक नितीन मुंंडावरे, नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासार पाटील, पक्षीमित्र आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट यांच्या उपस्थितीत झाले. पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलीस निरीक्षक साजन सोनवणे उपस्थित होते.

प्रा. सुरेखा बोर्‍हाडे यांनी गोदावरी नदी याविषयी एकपात्री नाटिका सादर केली. पंधरा मिनिटे नदीच्या उगमापासून ते समुद्राला मिळेपयर्ंंतचा प्रवास उत्कृष्टपणे सांगितला. यानंतर गजानन महाराज गुप्ते मंदिरात चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी तिरावरील वर्णनावर साकारलेल्या दीडशेहून अधिक चित्रांच्या प्रदर्शनाला प्रारंंभ झाला. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी चित्रप्रदर्शनाचे कौतुक केले.

दोन तास चाललेल्या वारसाफेरीत देवमामलेदार मंदिर, दुतोंड्या मारूती, अहिल्याराम मंदिर, मुरलीधर मंदिर व नारोशंंकर मंदिर अशी वारसाफेरी पार पडली. गुरुवारी( ता 16) सायंकाळी : 5.30 ते 7. नदीच्या अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते यांचे नदी संस्कृती यावर व्याख्यान दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार येथे होईल. महेश शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले.

अधिकारी येता गोदातिरी तेव्हाच होते स्वच्छता खरी

पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी या मार्गे गोदावरी काठी येणार असल्याने सकाळी सहापासूनच पोलीस बंंदोबस्त तैनात होता. येणार्‍या विक्रेत्यांंना येथे रस्त्याच्या कडेला बसण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे दुकानाच्या आडोशाला कसेबसे दुकान थाटून विक्रेते बसले होते. रस्ते तर चकाचक स्वच्छ फक्की मारुन सरकारी रांगोळी काढून सजावले होते. सकाळी दहापर्यंंत हा परिसर अतिशय स्वच्छ व अतिक्रमणमुक्त होता. अधिकार येता गोदातिरी तेव्हाच स्वच्छता होते खरी, याची जाणीव या निमित्ताने झाली.

गोदावरी नदी व त्याकाठची वारसास्थळे नाशिकची मोलाची संपत्ती आहे. ती जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. हा वारसा जपत आपल्याला विकास साधायला आहे. गोदावरीवरील विशेष प्रेमामुळे नाशिकशी आपले नाते घट्ट झाले आहे. गोदावरी बद्दल सर्वांच्या मनात आदरभाव निर्माण होणे गरजेचे आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी Suraj Mandhare, collector, Nashik

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com