मनपाने हाती घेतली गोदा पात्र स्वच्छता मोहिम

मनपाने हाती घेतली गोदा पात्र स्वच्छता मोहिम

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिकेतर्फे (Nashik Municipal Corporation) गोदावरी नदी पात्राची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या सुचनेनुसार आणि उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅश स्किमर मशीनद्वारे (Trash skimmer machine) गोदावरीची ही स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत दररोज सुमारे आठ ते दहा टन पाणवेली हटविण्याचे सध्या हे काम चांदशी शिवार येथे सुरु आहे. सुरुवातीला शहरातील होळकर पुल, घारपुरे घाट तसेच चोपडा लॉन्स परिसरात क्रॅश स्कीमर मशीनद्वारे पाणवेली काढण्यात आली.

मनपाने हाती घेतली गोदा पात्र स्वच्छता मोहिम
राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? CM शिंदेंचा ठाकरेंना सवाल

स्मार्ट सिटीकडून (Smart City) होत असलेल्या या कामावर आता महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. गोदावरी नदी आणि तिचे पात्र नितळ, स्वच्छ राहण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासह सामाजिक संस्था, एनसीसी कॅडेट्स यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहिम राबवली जात आहेत. तसेच यादरम्यान प्लास्टिक बंदीबाबतही जनजागृती करण्यात आली. यापुढेही सातत्याने स्वच्छता मोहिम राबवून, जनजागृती करुन गोदापात्र स्वच्छ ठेवण्याची दक्षता घेतली जाणार असल्याचे उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे (Dr. Vijayakumar Mundhe) यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com