ऊसतोडणी मजुरांच्या आगमनाने गोदाकाठ गजबजला

ऊसतोडणी मजुरांच्या आगमनाने गोदाकाठ गजबजला

निफाड । प्रतिनिधी | Niphad

यावर्षीचा साखर कारखाना (Sugar factory) हंगाम दीपावलीपुर्वीच (diwali) सुरू झाल्याने तालुक्याच्या गोदाकाठ भागात

नांदगाव (nandgaon), येवला, मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड तालुक्यातील ऊसतोडणी मजूर (Sugar cane worker) सहकुटूंब डेरेदाखल झाले असून या मजुरांच्या आगमनाने गोदाकाठची गावे गजबजली असून, या गावातील दळणवळण व आर्थिक उलाढाल व्यावसायिकांना देखील खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत.

तालुक्याच्या गोदाकाठ भागात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने दरवर्षी या कारखाना गाळप हंगामात या परिसरात नाशिक (nashik), कादवा (Kadwa), रासाका (RASAKA), कोळपेवाडी, संजीवनी, संगमनेर, प्रवरा कारखान्याचे ऊस तोडणी कामगार डेरेदाखल होत असतात. यावर्षी दिवाळीपूर्वीच अनेक कारखान्यांचे ऊसतोडणी कामगार (Sugar cane workers) दाखल झाले असून या कामगारांनी गावाच्या कडेला आपल्या झोपड्या थाटल्या आहेत. त्यामुळे पुढील पाच ते सात महिने हे कामगार याच परिसरात राहणार असून या कामगारांमुळे गोदाकाठच्या गावातील आर्थिक उलाढाल वाढण्याबरोबरच अनेक शेतमजुरांच्या पशुधनाचा चार्‍याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

हे कामगार आपल्या मुलाबाळासह येत असल्याने वरील तालुक्यातील अनेक गावांमध्ये या मजुरांअभावी शुकशुकाट होवू लागला आहे. कुटुंबाचा चरितार्थ हे मजूर टोळी मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात उचल घेऊन सदरची रक्कम ऊसतोडणीच्या मजुरीतून फिरविली जाते. गावातून येतांना हे मजूर धान्य, किराणा, कपडे, जनावरे बरोबर घेऊन येतात. ऊसतोडणी हंगामात (sugarcane harvesting season) ऊसतोडणीतून मिळणार्‍या ऊस बांडी विक्रीतून उदरनिर्वाह चालवितात. तसेच आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेत मुलासह स्वत:चेे कपडे धुणे, बाजार, धान्य, दळण आदी कामे घेतात.

सूर्योदयाच्या बरोबरीने हे मजूर शेतात ऊसतोडणीला सुरुवात करतात. साधारणपणे दुपारी 12 तेे 1 वाजेपर्यंत ऊस तोडून त्यानंतर तोडलेल्या ऊसाची चिपाटे काढून मोळी बांधणे व दुपारी 4 ते 5 वाजेनंतर ट्रक लोड करणे आदी कामे करून त्यानंतर आपल्या अड्डयाकडे परततात. दिवसभराचा हा नित्याचा क्रम ठरलेला असतो. साधारणपणे या मजुरांना कारखान्याकडून प्रती टन 300 ते 350 रु. मिळतात तर हे मजूर दिवसभरात 12 ते 15 टन ऊस तोडून तो ट्रकमध्ये भरतात.

मात्र त्यासाठी एका टोळीत साधारण 16 ते 20 महिला पुरुष काम करतात. ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने फळे, भाजीविक्रेते, पाव विक्रेते तसेच पानटपरी, किराणा, धान्य विक्रेते, पिठ हॉटेल आदी व्यावसायिकांचे व्यवसाय देखील बहरले आहेत. त्यामुळे पुढील सहा ते सात महिने गोदाकाठची गावे या मजुरांनी गजबजलेली दिसणार आहे.

या मजुरांबरोबरच द्राक्षबागेसाठी लागणारे मजूर देखील पेठ, सुरगाणा, सापुतारा परिसरातून मोठ्या प्रमाणात तालुक्यात दाखल झाल्याने संपूर्ण तालुक्यात हे मजूर मोठ्या प्रमाणात दिसू लागले असून हिवाळ्यात तालुक्यात मजुरांच्या संख्येत लक्षणीय होत आहे. अनेक मजूर कारखान्याच्या जुगाडच्या सहाय्याने ऊस वाहतूक करतात तर काही ट्रक मालक ऊस वाहतुकीसाठी ट्रक भाड्याने लावतात. एकूण ऊसतोडणीतून सर्वांना काम मिळून रोजगाराचा प्रश्न मार्गी लागत आहे.

गावी काम नसल्याने ऊसतोडणीला येतो मी गेल्या दहा वर्षापासून कोळपेवाडी साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीसाठी या परिसरात सहकुटूंब येत असतो. माझ्या गावातून ते 50 कुटुंबे दरवर्षी ऊसतोडणीसाठी येतात. नियमित येत असल्याने इकडच्या शेतकर्‍यांची चांगली ओळख झाली आहे. कारखाना ऊसतोडणीसाठी 350 रुपये टनाप्रमाणे पैसे देतो. मात्र, या मजुरीत भागत नाही. त्यात मुकादमाकडून घेतलेली उचल फिरविण्यातच जाते. मात्र गावाकडे काम नाही म्हणून आम्ही सहकुटूंब ऊसतोडणीसाठी येतो.

- राजाराम चव्हाण, रा. पिंपरी हवेली (ता. नांदगाव)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com