
पंचवटी | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील (Panchavati) गोदा घाट परिसर हे नाशिकचे वैभव व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जगभरातील अनेक भाविक या ठिकाणी गोदावरीच्या (godavari rver) स्नानासाठी व विविध देवतांच्या दर्शनासाठी सातत्याने येत असतात.
भाविकांचे नातेवाईक व आप्तस्वकीय हे देखील त्यांच्या भेटीसाठी येत असतात. अनेक दिवसापासून या ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) बसवण्यात आलेले असले तरी कार्यरत नसल्याने या ठिकाणी भाविकांच्या व नातेवाईकांच्या दुचाकी वाहने चोरीचे (Theft of vehicles) प्रमाण व मौल्यमान वस्तू चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्ही (CCTV) लावलेले असले तरी ते कार्यरत नाही त्यामुळे भुरटे चोर व सराईत गुन्हेगार या ठिकाणी बिनधास्तपणे चोऱ्या करीत आहेत त्याचा फटका भाविकांना व त्यांच्या नातेवाईकांना सातत्याने बसत आहे.
गर्दीचा फायदा घेऊन वाहन चोरी करणारे आणि भाविकांच्या मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराई चोरट्यांपासून खूप त्रास होत आहे. या ठिकाणी समोरच पोलीस चौकी असली तरी ती 24 तास सुरू नसल्याने चोरटे अधिक फायदा घेत आहेत असे दिसून येत आहे. विश्रांत गृहाच्या जाळ्या अनेक महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत त्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्याचे देखील धाडस संबंधित प्रशासनाने घेतलेले दिसत नाही त्यामुळे विश्रांतर गृहाचा उपयोग भाविकांना फारसा होत नाही.
परिसरातील भुरट्या चोरांना अटका व्हावा म्हणून सीसीटीव्ही त्वरित सुरू करणे काळाची गरज असल्याचे अनेक भाविकांनी बोलून दाखवले आहे. बुधवारी आठवडे बाजार असल्याने या परिसरात प्रचंड गर्दी असते त्याचा देखील भुरटे चोर फायदा घेत असतात त्यावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे देखील येथील परिसरातील रहिवासी नागरिक व्यापारी तसेच भाविकांनी सांगितले आहे.
विश्रांतगृहाच्या सिमेंटच्या जाळ्या तुटल्याने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली गेली नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जाळ्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी देखील मागणी भाविक भक्तांनी केली आहे.