नांदगाव : ट्रॅक्टर चोरी पाठोपाठ तालुक्यातून 'इतक्या' शेळ्या चोरीला

नांदगाव : ट्रॅक्टर चोरी पाठोपाठ तालुक्यातून 'इतक्या' शेळ्या चोरीला

नांदगाव | Nandgaon

नांदगाव शहरात व ग्रामीण भागामध्ये दुचाकी,घरफोडी, अनेक प्रकारच्या  चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज एक ते दोन प्रकार समोर येत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून ट्रॅक्टर चोरीची घटना ताजी असतानाच तालुक्यातील जळगांव बुद्रुक येथील शेतकरी सुदाम आहिरे यांच्या शेडमधून २० शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील जळगांव बुद्रुक येथील शेतकरी सुदाम महादू आहिरे यांच्या शेळीच्या शेडमधून लहान-मोठ्या २० शेळ्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरीस गेल्याचे सकाळी निदर्शनास आले. सगळीकडे शोधाशोध केली असता शेळ्या आढळून आल्या नाहीत.

नांदगाव : ट्रॅक्टर चोरी पाठोपाठ तालुक्यातून 'इतक्या' शेळ्या चोरीला
इतिहासात भोपळा, कलेत मात्र १००...; मार्कशीट व्हायरल करत राष्ट्रवादीनं कोश्यारींना डिवचलं

यामुळे शेतकऱ्यांचे लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून नांदगाव  शहरात व तालुक्यात दुचाकी, चारचाकी वाहने, शेतकऱ्यांच्या चीजवस्तू, शहरातील घराबाहेरील सामान अशाप्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नांदगाव : ट्रॅक्टर चोरी पाठोपाठ तालुक्यातून 'इतक्या' शेळ्या चोरीला
...अन् सुषमा अंधारेंचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ सापडला

त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे. हे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. या घटना घडत असताना पोलिसांची गस्त कुठे आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com